‘उदय इंडिया’ यू ट्यूब वाहिनीवर विशेष मुलाखत

नवी देहली – ‘धर्माे रक्षति रक्षितः’ (धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो) या उक्तीनुसार राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सनातन संस्थेच्या वतीने देहलीतील प्रतिष्ठित ‘भारत मंडपम्’ येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाचे निमित्त साधून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम राष्ट्रद्वेषी शक्तींच्या विरोधातील एक प्रखर ‘शंखनाद’ ठरेल, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘उदय इंडिया’ या यू ट्यूब वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. वाहिनीचे श्री. अंशुमान आनंद यांनी ही मुलाखत घेतली.
‘राजधानीतील असुरक्षिततेच्या वातावरणात राष्ट्ररक्षणाचा जागर’ या महोत्सवाच्या उद्देशाविषयी बोलतांना श्री. रमेश शिंदे म्हणाले की, आज देहलीसारख्या राजधानीत दंगली घडवल्या जातात, बाँबस्फोट करणारे देशद्रोही सापडतात. लाल किल्ल्याजवळ नुकत्याच झालेल्या बाँबस्फोटामध्ये ‘अल् फलाह’ विद्यापिठामधून शिकलेले मुसलमान आधुनिक वैद्य सहभागी होते. अशा असुरक्षिततेच्या वातावरणात केवळ चर्चा न करता कृतीशील उपाययोजना मांडण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे. इंग्रजांनी वर्ष १८८५ मध्ये ‘शस्त्रास्त्र कायदा’ (वेपन्स ॲक्ट) आणून हिंदूंना नि:शस्त्र केले, ती मानसिकता आजही कायम आहे. या पार्श्वभूमीवर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून हा महोत्सव पार पडणार आहे. १३ डिसेंबरचा दिवस ‘संस्कृती रक्षण’ आणि १४ डिसेंबरचा दिवस ‘राष्ट्र सुरक्षा’ या विषयांवर अनेक मंत्री, सैन्यातील माजी अधिकारी, विचारवंत आणि मान्यवर मार्गदर्शन करतील.
शिवकालीन मूळ शस्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शन !
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे भारत मंडपम्’च्या सभागृह क्र. १२ मध्ये होणारे शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन ! यात केवळ मावळ्यांचीच नव्हे, तर त्या काळातील राजस्त्रिया आणि बालयोद्धे यांचीही शस्त्रे पहाता येणार आहेत. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झालेली अनेक मूळ शस्त्रे देहलीकरांना पहाण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. स्वराज्यात महिला आणि बालकेही स्वसंरक्षणासाठी किती सजग होती, हे या प्रदर्शनातून स्पष्ट होईल.
‘सव्यसाची गुरुकुलम्’च्या युवतींची शौर्यगाथा !
आजच्या काळात मुले परीक्षेच्या तणावाखाली असतात; मात्र शिवकाळात बालवयातच शस्त्रविद्येत पारंगत कसे होता येत होते ? हे दाखवण्यासाठी कोल्हापूर येथील ‘सव्यसाची गुरुकुलम्’चे विद्यार्थी उपस्थित रहाणार आहेत. विशेष म्हणजे यात अनेक युवती आणि रणरागिणी पारंपरिक शस्त्रांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करणार आहेत.
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !