समान नियम लागू करण्याचे काहीही कारण नाही !

‘नमाजासाठी मशिदीला भोंगे वापरता येणार नाहीत’, याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने निर्णय दिला आहे. या वेळी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी ‘कोणत्याही धर्माने ध्वनीक्षेपक किंवा ढोल वाजवून प्रार्थना करण्याची अनुमती दिलेली नाही’, असे म्हटले आहे. यावर भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांनी केलेले भाष्य येथे देत आहोत.
‘सर्व धर्मांना समान मान्यता’, हे सूत्र जे अलीकडे चालू आहे, ते मुळातच चुकीचे आहे. हिंदुस्थानची फाळणी हिंदु आणि मुसलमान यांच्यासाठी करतांना भारत अन् पाकिस्तान असे २ देश इंग्रजांनी बनवले. त्याला आपणही मान्यता दिली. हिंदूंसाठी ‘भारत’ आणि मुसलमानांसाठी ‘पाकिस्तान’ असे पद्धतशीर ठरवले गेल्याने दोन्ही देशांना समान नियम लागू करण्याचे काहीही कारण नाही. आपल्या देशात मशिदीवर भोंगे लावण्यावर बंदी आणतांना ते सूत्र सर्व धर्मांना लागू करण्याचे काही कारण नाही. हा हिंदुस्थान आहे आणि हिंदूंचा देश आहे अन् या देशामध्ये पाकिस्तानसारखे नियम लावू नयेत. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय देऊन पाकिस्तानसारखेच नियम आमच्याकडे (भारताकडे) किंवा आमच्यासारखे नियम पाकिस्तानला कुणी लावू शकत नाही. परिणामी हिंदूंना अशा प्रकारे उच्च न्यायालयाने म्हणणे, हे बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात कितपत योग्य होईल, असे वाटल्यास चुकीचे ते काय ? त्यामुळे या निर्णयामध्ये हिंदुस्थानमधील हिंदूंना गोवण्याचे काही कारण नाही, असे वाटते.
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१२.२०२५)
अनैतिकतेचा बाजार !
वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !
पब-हॉटेल्स कि मृत्यूचे सापळे ?
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !