RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेकडून ‘रेपो रेट’मध्ये पाव टक्क्यांची कपात : हप्त्यांचे ओझे अल्प होणार

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा

नवी देहली – रिझर्व्ह बँकेने ‘रेपो रेट’मध्ये २५ बेसिस पॉइंट्सची, म्हणजेच पाव टक्क्यांची कपात करत तो ५.२५ टक्के करण्याचा निर्णय घेतला. हा याआधी ‘रेपो रेट’ ५.५० टक्के होता. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे नागरिकांवरील हप्त्यांचे ओझे अल्प होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ३ दिवसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. हा ‘रेपो रेट गेल्या काही वर्षांतील सर्वांत अल्प आहे.

‘रेपो रेट’ म्हणजे काय ?

ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतात, त्या दराला ‘रेपो रेट (दर)’ म्हणतात. रेपो दर वाढणे म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणार्‍या कर्जदरात वाढ होणे. ‘रेपो’ दर अल्प होणे म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणे. याचाच अर्थ जर ‘रिझर्व्ह बँके’ने ‘रेपो रेट’मध्ये वाढ केली, तर सामान्यांच्या कर्जात वाढ होते आणि कपात केली, तर कर्जाचे हप्ते घटतात.