राजधानीत अनेक ठिकाणी प्रसार मोहीम !

(‘स्टँडी बॅनर’ म्हणजे विज्ञापन किंवा माहिती यांसाठी वापरला जाणारा मोठा, उभा फलक. हा फलक सहसा प्रदर्शने, दुकाने, रस्ते किंवा कार्यक्रम स्थळांवर लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वापरला जातो.)
नवी देहली – ‘शंखनाद महोत्सवा’च्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवछत्रपतींच्या काळातील शस्त्र प्रदर्शन’ या उपक्रमाची माहिती देणारे ‘स्टँडी बॅनर’ नवी देहलीतील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. येत्या १३ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत ‘भारत मंडपम् हॉल १२’ येथे होणार्या या ऐतिहासिक प्रदर्शनासाठी देहलीकरांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. येथील प्राचीन हनुमान मंदिर, कॉनॉट प्लेस यांसारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी, तसेच राजधानीतील इतर अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक स्थळी सनातन संस्थेच्या वतीने या महोत्सवाचा प्रसार ‘स्टँडी बॅनर’द्वारे चालू आहे. नवी देहलीतील हा ‘शंखनाद महोत्सव’ नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ऐतिहासिक होणार आहे.
| माहिती फलक ठरले आकर्षणाचे केंद्र !
आकर्षक माहिती फलकावर ‘शंखनाद महोत्सव’ आणि ‘शिवछत्रपतींच्या काळातील शस्त्रप्रदर्शन’ अशी ठळक अक्षरे असल्याने नागरिक उत्सुकतेने थांबून माहिती घेत आहेत. |

राष्ट्रभक्तीची प्रेरणा !
या फलकावर प्रदर्शनाचा कालावधी, स्थळ आणि सहभागी होण्यासाठी नावनोंदणी कशी करायची ? याची माहिती आहे. नागरिक सहभागी होण्याची लिंक आणि काही जण क्यूआर् कोडवरून नावनोंदणी करत आहेत. ‘शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन पहाण्याची संधी देहलीत मिळत आहे, हे पाहून पुष्कळ आनंद झाला’, ‘या प्रदर्शनातून आम्हाला केवळ शस्त्रांची माहिती मिळणार नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि राष्ट्रभक्ती यांची प्रेरणा मिळेल’, अशा प्रतिक्रिया अनेक तरुणांनी फलकाजवळ व्यक्त केल्या.
शंखनाद महोत्सवाच्या प्रसारासाठी आलेल्या सनातन संस्थेच्या साधकांनी नागरिकांना केवळ फलकावरील माहिती न देता, प्रदर्शनाचे ऐतिहासिक महत्त्व आणि धर्मजागृतीसाठी असलेले त्याचे योगदान समजावून सांगितले.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन