शेतकर्यांना आंदोलन करण्यास भाग पाडणारे प्रशासन !

वेंगुर्ला – मे आणि जून या महिन्यांत १० ते १५ दिवस अवेळी पाऊस पडल्याने कोकम पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. शासनाकडून कोकम उत्पादक शेतकर्यांना द्यायची हानीभरपाई संबंधित खात्याकडे प्राप्त झाली आहे. त्यामुळे येत्या ४ दिवसांत शेतकर्यांना हानीभरपाई न मिळाल्यास आंदोलन करण्याची चेतावणी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेने दिली आहे. याविषयीचे निवेदन संघटनेने तालुका तहसील कार्यालयात दिले आहे.
अवेळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या कोकमच्या हानीचे पंचनामे करण्यात आले; मात्र शेतकर्यांना हानीभरपाई अद्याप मिळालेली नाही. याविषयी वेळोवेळी प्रशासकीय स्तरावर शेतकर्यांनी संपर्क साधला, तसेच संघटनेच्या माध्यमातून निवेदनही देण्यात आले. तरीही हानीभरपाई मिळाली नाही. वेळोवेळी तांत्रिक कारणे सांगितली जातात. हे शेतकर्यांच्या दृष्टीने योग्य नाही. पुढील हंगाम काही दिवसांत चालू होणार आहे, तरीही याची नोंद कुणी घेत नाही, असे संघटनेने या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतांना छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय, प्रदीप सावंत, दिगंबर शेटकर, महादेव गावडे, देवीदास गावडे यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !