माहिती अधिकारातून माहिती उघड !

नागपूर – महाराष्ट्रामध्ये एप्रिल २०२२ ते २०२५ या ४ वर्षांच्या कालावधीत ४३ सहस्र ६६२ अर्भक (० ते १ वर्ष) आणि ७ सहस्र ३८५ बालकांचा (१ ते ५ वर्ष) मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही आकडेवारी उघड केली आहे.
१. राज्यातील माता मृत्यूची आकडेवारीही चिंताजनक आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२३ या ३ महिन्यांत २३२ मातांचा मृत्यू झाला, तर २०२३ ते २०२४ या एका वर्षात ही संख्या १ सहस्र १३१ होती.
२. वर्ष २०२४ ते २०२५ मध्ये १ सहस्र १०६ आणि जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२५ या काळात ५९९ माता मृत्यूंची नोंद झाली आहे. एकूण माता मृत्यूंच्या संख्येतही वाढ दिसून येते.
३. वर्ष २०२३ ते २०२४ मध्ये ११ सहस्र ७२६, वर्ष २०२४ ते २०२५ मध्ये १२ सहस्र ६८५ आणि एप्रिल २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत ६ सहस्र ४७१ माता मृत्यू झाले.
४. याच ४ वर्षांच्या कालावधीत राज्यात ११ सहस्र ८४० बालकांना हृदयदोष असल्याचे निदान झाले. त्यांपैकी ११ सहस्र ३३६ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
५. हृदयदोष असलेल्या बालकांच्या आकडेवारीत एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ मध्ये ४ सहस्र १६१, एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ मध्ये ३ सहस्र ४३५, एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ मध्ये ३ सहस्र २२६ आणि एप्रिल २०२५ ते सप्टेंबर २०२५ मध्ये १ सहस्र १८ बालकांचा समावेश आहे.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर आणि उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध असतांनाही सहस्रावधी अर्भकांचा मृत्यू होणे चिंताजनक ! |
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव