
१. भगवान दत्तात्रेयांचा भारतवर्षात सर्वत्र संचार
भारतवर्षात असा एकही प्रदेश नाही की, जिथे श्री दत्तात्रेयांचा संचार झालेला नाही. काश्मीरपासून दक्षिणेपर्यंत हा संचार झालेला आहे. पंजाबच्या बाजूला राजेंद्रगडावर दत्तांचे स्थान आहे. बंगाल-बिहारकडे महेंद्रपर्वताची एक संपूर्ण रांग दत्तनिवासाची आहे. इकडे नाथ आणि चैतन्य संप्रदाय वसत होता. नगरच्या बाजूला मत्स्येंद्रगडी दत्तांचा निवास होता. आसाम, गुजरात आणि कर्नाटक या सर्व राज्यांमध्ये दत्तांची मोठी स्थाने आहेत अन् तेथे तीर्थयात्राही भरतात. अबू पहाड (राजस्थान), नीलगिरी पर्वत आणि महाराष्ट्राच्या सीमेवर कर्नाटकात थोडे खाली उतरल्यावर जो प्रदेश लागतो, तेथे दत्तांची स्थाने आहेत. भारतवर्षाच्या चतुःसीमा आणि आतील प्रदेश येथे सर्वत्र दत्तात्रेयांचा मोठ्या प्रमाणावर संचार आहे.
२. दत्तात्रेयांनी गुणातीत अवस्थेचा विहार आणि संचार शिकवणे
सर्व संप्रदायांचे साधनामय असे स्वरूप असते. सर्व संप्रदायांनी त्यांच्या देवतेच्या साहाय्याने मोक्षाप्रत जाणे, हे कार्य साधले आहे. दत्तात्रेयांचे विशेष असे की, मोक्षाच्या पुढील गुणातीत अवस्थेचा विहार आणि संचार त्यांनी शिकवला.
३. मुमुक्षू किंवा साधक यांना अखंड सांभाळून त्यांना युगपुरुषाच्या स्वाधीन करणारे श्री दत्तात्रेय !
‘गुरुगीते’त श्री दत्तात्रेयांचे मोठे गोड वर्णन आहे. ‘अवधूतगीते’मध्ये त्याहीपेक्षा छान वर्णन आहे. ‘ज्ञानामृतं समरसं गगनौपमोहम्’ म्हणजे आकाशाप्रमाणे असीम, म्हणजे सीमा नसलेले अशा स्वरूपाचे दत्त या संपूर्ण विश्वामध्ये अहर्निश आणि अखंड मुमुक्षू किंवा साधक यांना सांभाळतात अन् त्यांना युगपुरुषाच्या स्वाधीन करतात.’
४. दत्तात्रेयांनी यदु राजाला विरक्त होऊन विश्वाचे दायित्व सांभाळण्याविषयी दिलेली शिकवण
श्री दत्तात्रेयांनी अनेक राजांना फकीर बनवले. त्यातील सर्वांत मोठा यदु ! यदूने राज्य चालवले; परंतु ‘यति (संन्यासी, विरक्त) होऊन, म्हणजे खर्या अर्थाने विश्वाचे दायित्व सांभाळतांना जगापासून अलिप्तता कशी सांभाळावी ?’, ही मोठी व्यवस्था भगवान दत्तात्रेयांच्या माध्यमातून जगाला कळली.
५. दत्तात्रेयांचे वाङ्मय
वेगवेगळ्या साधकांना सांगितलेल्या दत्तांच्या एकूण ११० गीता आहेत, तसेच ‘दत्तपुराण’ आहे. ‘यदु-यति संवाद’ ग्रंथ हाही भगवान दत्तांचाच आहे.’
– श्री संत बाबामहाराज आर्वीकर
(साभार : ग्रंथ ‘श्रीदत्तोपासना’)
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !