३ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक !

नाशिक – येथे वर्ष २०२७ मध्ये होणार असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणा’च्या वतीने बोधचिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे ३, २ आणि १ लाख रुपयांच्या पारितोषिकांसह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी २० डिसेंबर २०२५ पर्यंत प्रवेशिका पाठवता येणार असून ‘देशभरातील अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी व्हावे’, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.
नवीन बोधचिन्हाची ओळख भूतकाळातील आवृत्त्यांच्या वारशावर आधारित असेल. भक्ती आणि एकतेची कालातीत भावना साकार करणारे बोधचिन्ह हवे. आधुनिक, संदर्भात्मक आणि भारत अन् जगभरातील विविध प्रेक्षकांसाठी आकर्षक असे बोधचिन्ह असावे. बोधचिन्ह संस्मरणीय असावे. हे बोधचिन्ह नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या आध्यात्मिक सार आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
| याविषयी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी www.mygov.in किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. |
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी