|

मुंबई – ‘आयआयटी बाँबे’च्या नावात तुम्ही ‘बाँबे’ कायम ठेवले आणि त्याचे मुंबई केले नाही, यासाठी मी खूश आहे. ‘आयआयटी मद्रास’विषयीही माझ्या याच भावना आहेत, असे विधान केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयआयटी मुंबई येथे केले. ‘आयआयटी मुंबई’च्या पी.सी. सक्सेना सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. जितेंद्र सिंह क्वांटम-तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती या विषयावर भाष्य केले. त्यांच्या या भूमिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे.
नाक घासून मराठी माणसाची क्षमा मागा ! – गजानन काळे, मनसे

याला विरोध करत मनसे नेते गजानन काळे म्हणाले, ‘‘अशा प्रकारे निर्लज्ज विधान केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबईत येऊन केले आहे. मराठी, मुंबई आणि महाराष्ट्र यांचा अपमान करण्याची एकही संधी भाजपचे नेते सोडत नाहीत. तुम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळ या, पश्चात्ताप करा आणि नाक घासून मराठी माणसाची क्षमा मागा. पुढच्या वेळी डॉ. जितेंद्र सिंह मुंबईत आल्यास त्यांचा मनसेच्या वतीने ‘सत्कार’ करण्यात येईल.’’
‘आयआयटी मुंबई’साठी प्रस्ताव पाठवण्याची मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा ! – किरीट सोमय्या, भाजप

यासंदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले, ‘‘आयआयटी बाँबे’ ऐवजी ‘आयआयटी’ मुंबई असे करावे, याविषयीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा’, अशी चर्चा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत केली आहे. ‘बाँबे हायकोर्ट’चेही आम्हाला ‘मुंबई’ हायकोर्ट हवे आहे.’’
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक