पुणे येथे ‘पवित्रम् फाऊंडेशन’कडून ‘पवित्रम् मोबाईल ॲप’चे लोकार्पण !

पुणे, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – सर्व प्रकारची व्यवसाय क्षेत्रे अन्य धर्मीय लोकांनी शांतपणे कह्यात घेतली आणि आपल्यावर आक्रमण केले. ३५ हून अधिक प्रकारचे जिहादी युद्ध आपल्यावर लादले जाते. हे युद्ध परतवून लावण्यासाठी आपण समर्थ आहोत का, यापेक्षा जागृत आहोत का ? हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी बाँब, पिस्तूल उचलण्याची आवश्यकता नाही. केवळ ‘पवित्रम् ॲप’ वापरण्याची आवश्यकता आहे. ‘मी वस्तू खरेदी करून खर्च केलेले पैसे कुठे जाणार ?’ याचा विचार करायला हवा. हिंदु समाज संघटित झाला, तर उर्वरित निष्क्रीय होतील. हिंदु समाजातील पैसा हिंदु समाजातच टिकला पाहिजे, असे मत ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, अयोध्या’चे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, मथुराचे अध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी व्यक्त केले.
| या वेळी ‘पवित्रम् फाऊंडेशन’चे श्री. तुषार कुलकर्णी यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली येथील शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले. |
हिंदूंचे आर्थिक प्रबोधन आणि सक्षमीकरण या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘पवित्रम् फाऊंडेशन’ या संस्थेने हिंदु व्यावसायिक आणि ग्राहक यांना एका व्यासपिठावर आणण्यासाठी ‘पवित्रम्’ हे नवे ‘मोबाईल ॲप’ विकसित केले आहे. या ॲपचा लोकार्पण सोहळा एरंडवणे येथील शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरीयम, कर्नाटक हायस्कूल येथे पार पडला. या वेळी मार्गदर्शन करत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण, तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योजक कृष्णकुमार गोयल, ‘पवित्रम् फाउंडेशन’चे अध्यक्ष सुबोध शहा, तुषार कुलकर्णी आदी उपस्थित होते.

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज पुढे म्हणाले की, प्रत्येकामध्ये हिंदुत्वाची चाड निर्माण होण्याची आणि सक्रीय होण्याची आवश्यकता आहे. समाजाला सावरण्यासाठी १० ते २० वर्षे आहेत, जर आता सावरलो नाही, तर नंतर काय होईल, सांगता येत नाही.
‘पवित्रम् फाऊंडेशन’चे श्री. तुषार कुलकर्णी म्हणाले की, हिंदु समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आपल्याला एकत्र येणे आवश्यक आहे. ‘पवित्रम्’ ॲप हे केवळ तांत्रिक साधन नसून, हिंदु व्यापारी आणि ग्राहक यांना जोडणारे एक सशक्त व्यासपीठ आहे. या उपक्रमाद्वारे ‘हिंदू खरेदी हिंदूंकडून’ ही संकल्पना वास्तवात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !