
नवी देहली, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – विविध क्षेत्रांत राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी कार्यरत असलेल्या मान्यवरांनी समस्त धर्मप्रेमी हिंदूंना देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या कालावधीत होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे आवाहन व्हिडिओद्वारे केले आहे.
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ सनातन संस्कृतीच्या तेजाचा अविस्मरणीय उत्सव ठरेल – कर्नल (नि.)मोहन काकतीकर, मुख्य कार्यवाह, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती, नवी देहली
देहली येथे होणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आपला वैभवशाली इतिहास आणि सनातन संस्कृती यांच्या तेजाचा अविस्मरणीय उत्सव ठरणार आहे. या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील अद्वितीय शस्त्रांचे प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन भारतीय शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमान यांचे प्रतीक ठरेल. सनातन धर्माच्या अखंड तेजाची जपणूक करण्यासाठी, तसेच तरूण पिढीत राष्ट्राभिमान आणि संस्कार जागवण्यासाठी प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त राष्ट्र आणि हिंदु धर्म प्रेमींनी या ऐतिहासिक महोत्सवात सहभागी व्हावे.
सांस्कृतीक चेतनेचे पुनर्जागरण घडवून आणणारे भव्य आंदोलन ! – उदय साहाय, सेवानिवृत्त भारतीय पोलीस अधिकारी
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा केवळ एक उत्सव नाही, तर संपूर्ण देशात आपल्या सांस्कृतिक चेतनेचे पुनर्जागरण घडवून आणणारे एक भव्य आंदोलन आहे. या महोत्सवाच्या आयोजनाशी माझा निकटचा संबंध असल्याचा मला अपार अभिमान वाटतो. या महोत्सवात राष्ट्र आणि अंतर्गत सुरक्षा, यांवर आधारित सांस्कृतिक दृष्टीकोनातून चर्चासत्रे होणार आहेत. बुद्धीजीवींच्या विचारविनिमयासाठी आणि राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरेल. सर्वांनी या भव्य उपक्रमात सहभागी होऊन योगदान द्यावे, असे मी आवाहन करतो.
राजधानीतून संपूर्ण विश्वाला सनातन राष्ट्राचा दिव्य संदेश जाईल ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन वृत्तवाहिनी

हा महोत्सव देशाच्या राजधानीतून संपूर्ण विश्वाला सनातन राष्ट्राचा दिव्य संदेश देईल. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भवानी तलवार, तसेच अनेक ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शनही आहे. राष्ट्र आणि हिंदु धर्म प्रेमी यांनी स्वत:च्या परिवारासह या ऐतिहासिक महोत्सवाला उपस्थित रहावे.
इंद्रप्रस्थ (दिल्ली) में सनातन संस्था द्वारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ का आयोजन १३ एवं १४ दिसंबर २०२५ को किया जा रहा है. यह महोत्सव देश की राजधानी से पूरे विश्व को सनातन राष्ट्र के उद्घोष का संदेश देगा. इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज द्वारा उपयोग में लाई गई पवित्र ‘भवानी… pic.twitter.com/a0jjSnDLgq
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) November 1, 2025

काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !