इंद्रायणी काठी ‘माऊली-माऊली’च्या जयघोषात ‘अलंकापुरी’ दुमदुमली !

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा ७२९ वा ‘संजीवन समाधी सोहळा’ अर्थात् कार्तिक उत्पत्ती एकादशीचा भक्तीयोग साधण्यासाठी १४ नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्रातून शेकडो दिंड्या आळंदीत आल्या आहेत. इंद्रायणीकाठी वारकर्यांनी फुगडीचा फेर धरत, टाळ-मृदंगाच्या गजरात देहभान विसरून नाचण्याचा आनंद लुटला. रात्री १ वाजता माऊलींच्या समाधीवर ११ ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात पवमान अभिषेक आणि धुपारती करण्यात आली. दुपारी १२ ते १२.३० वाजता माऊलींना महानैवेद्य दाखवण्यात आला, १ वाजता ‘श्री’ ची नगरप्रदक्षिणा करून रात्री ८.३० वाजता धूपारती झाली. रात्री १२ ते २ वाजेपर्यंत श्री. मोझे यांच्याद्वारे जागर झाला. १६ नोव्हेंबर या दिवशी कार्तिक कृष्ण द्वादशी असून परंपरेनुसार माऊलींचा रथोत्सव असणार आहे.
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
आरोपीवर दोषारोप निश्चित !