माजी आमदार नितीन शिंदे आणि स्वाती शिंदे यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !

सांगली, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनी १४ नोव्हेंबर या दिवशी ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष अन् माजी आमदार श्री. नितीन शिंदे, तसेच त्यांची पत्नी आणि माजी नगरसेविका सौ. स्वाती शिंदे यांची सांगली येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी श्री. आणि सौ. शिंदे यांनी श्री. अभय वर्तक अन् डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा भगवी शाल घालून सत्कार केला.

या वेळी श्री. नितीन शिंदे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले की, मोठ्या चिकाटीने आणि जिद्दीने हिंदुत्वाचे कार्य करणारे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर हिंदुत्वाचे काम थांबवण्यासाठी खोटे खटले प्रविष्ट (दाखल) करून त्यांना ९ वर्षे कारागृहात डांबले; पण ते डगमगले नाहीत. सर्व हिंदूंनी त्यांचा आदर्श घ्यावा. आम्हाला त्यांच्या कार्याचा अभिमान आहे. त्यांच्याप्रमाणे अडथळ्यांशी सामना करत चिकाटीने हिंदुत्वाचे कार्य केले पाहिजे.

या वेळी माजी नगरसेविका सौ. स्वाती शिंदे म्हणाल्या, ‘‘नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आजपासून करण्यात येणार होता. त्या निमित्ताने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि श्री. अभय वर्तक यांचे पाय माझ्या निवासस्थानी लागल्याने मी धन्य झाले आहे.’’ असे सांगतांना त्यांचे डोळे भरून आले.

या वेळी श्री. अभय वर्तक यांनी देहली येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण श्री. नितीन शिंदे यांना दिले.
या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. स्मिता माईणकर, श्रीमती मधुरा तोफखाने, भाजपचे नेते श्रीकांत तात्या शिंदे, कार्यकर्ते सर्वश्री मनोज साळुंखे, अनिरुद्ध कुंभार, दिग्विजय शिंदे, अरविंद येतनाळे, शुभम गवळी, गजानन माने, श्रीधर मेस्त्री, पैलवान शांताराम शिंदे आदी उपस्थित होते.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक