
नवी देहली – येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मध्ये देशभरातील नामांकित विचारवंत, तज्ञ अन् राष्ट्रनिष्ठ व्यक्ती एकत्र येऊन राष्ट्रहिताच्या महत्त्वाच्या विषयांवर चिंतन-मनन करणार आहेत. त्यामुळे हा महोत्सव राष्ट्राच्या उन्नतीसाठी ठोस दिशा, विचार आणि उपाययोजना यांसाठी व्यासपीठ ठरेल, असा विश्वास ब्रिगेडियर संजय अगरवाल (निवृत्त) यांनी व्यक्त केला.
या महोत्सवाविषयी ब्रिगेडियर संजय अगरवाल (निवृत्त) म्हणाले, ‘‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पनेला समर्पित आणि भारतभूमीच्या दृढ पायाभरणीला बळ देणारा एक ऐतिहासिक सोहळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार, तसेच त्यांच्या कालखंडातील दुर्मिळ विविध ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. हे प्रदर्शन भारतीय शौर्यपरंपरेचे जिवंत प्रतीक ठरेल.’’
सनातन संस्थेच्या वतीने १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी ‘भारत मंडपम्’ येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र आणि धर्म कार्य कर्तव्यभावनेने करणारे विविध क्षेत्रांतील महनीय व्यक्ती या महोत्सवाला उपस्थित रहाणार आहेत.
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क