
भारताची फाळणी झाली नसती, तर आज एखादा मुसलमान भारताचा पंतप्रधान होऊ शकला असता’, असे विधान संभल (उत्तरप्रदेश) येथील समाजवादी पक्षाचे आमदार इकबाल महमूद यांनी केले. त्यांनी यासाठी लोकसंख्येचे कारण दिले. भारतात सध्या ३० ते ३२ कोटी मुसलमान असल्याचा त्यांनी दावा केला, तर पाकिस्तानमध्ये २५ कोटी आणि बांगलादेशात १५ कोटी, म्हणजे अखंड भारतात एकूण ७० कोटी मुसलमान असते. भारतात हिंदूंची लोकसंख्या १०० कोटी आहे. याचाच अर्थ लोकसंख्या पहाता मुसलमानांच्या मतांमुळे भारतात मुसलमान पंतप्रधान झाला असता, असा त्यांचा दावा आहे. एखाद्याला हा दावा खरा वाटू शकतो. मुळात हा जर-तरचा भाग आहे. जर फाळणी झाली नसती, तर वस्तूस्थिती वेगळी असती, यात शंका नाही. याचा विविध अंगांनी विचार केला, तर अनेक पैलू समोर येतील; कारण महमूद यांच्यानुसार केवळ लोकसंख्यावाढीचा विचार आताच्या स्थितीवरून करता येणार नाही. त्याला भौगोलिक स्थिती, अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती, राजकारण, दोन्ही धर्मियांची मानसिकता, सैनिकी क्षमता आदी अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल. त्याचप्रमाणे मुसलमानांमध्ये जात, भाषा यांच्या भेदातून होणारे वाद; हिंदूंमध्ये जात, भाषा, अस्मिता यांमुळे होणारे वाद, यांचाही अभ्यास तितकाच महत्त्वाचा आहे. यातूनच महमूद सांगतात, त्याचा विचार करावा लागेल.
मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत !

भारताची फाळणी होऊन पाकिस्तान नावाचा इस्लामी देश निर्माण झाला. त्या वेळी १० लाख हिंदूंची हत्या करण्यात आली, तर लक्षावधी हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आले. त्यानंतरही पाकिस्तानमध्ये ८ टक्के हिंदू राहिले होते; मात्र आज ते केवळ दीड टक्काच राहिले आहेत. म्हणजे ‘उर्वरित हिंदूंना बाटवण्यात आले किंवा ठार करण्यात आले’, असेच म्हणावे लागते. आजही अशा अनेक बातम्या समोर येत असतात, ज्यामध्ये हिंदूंच्या मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर केले जाते आणि नंतर मुसलमानाशी त्यांचा विवाह लावून दिला जातो. वर्ष १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान (सध्याचा) यांच्यात भाषेवरून आणि सत्तेचे सूत्र हातात ठेवण्यावरून वाद झाला आणि त्यातून पश्चिम पाकिस्तानातील पंजाबी मुसलमान सैनिकांनी बंगालमधील मुसलमान अन् हिंदू यांच्यावर प्रचंड अत्याचार केले. यात ३० लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जाते, तर लक्षावधी महिलांवर बलात्कार झाले. यामुळेच भारताने हस्तक्षेप करत पूर्व पाकिस्तानचा स्वतंत्र बांगलादेश निर्माण केला. म्हणजे भारतातून वेगळा झालेला पाकिस्तान एकसंघ राहू शकला नाही. आताच्या स्थितीत पाकमध्ये खैबर पख्तुनख्वा स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करत आहे. सिंधने यापूर्वी हा प्रयत्न केला; मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. बलुचिस्तान मुळात पाकचा भाग नव्हता. तो फाळणीनंतर पाकने बलपूर्वक कह्यात घेतला. तो आज स्वातंत्र्यासाठी झगडत आहे. पाकने काश्मीरचा काही भाग कह्यात घेतला. तेथेही अराजकाची स्थिती आहे. म्हणजेच मुसलमान म्हणून वेगळा देश घेतलेले लोक एकत्र राहू शकत नाहीत. तेथे अखंड भारत असता, तर हे मुसलमान एकत्र राहून देशात मुसलमान पंतप्रधान बसवू शकले असते का ? हा प्रश्न उपस्थित होतो. पाकमध्ये पंजाबी मुसलमानांच्या हातात पाकची सत्ता राहिलेली आहे, तसेच सैन्यातही त्यांचेच वर्चस्व आहे. पंजाबी मुसलमान पाकमधील अन्य मुसलमानांना दाबून ठेवत आले आहेत. आताही तेच चालू आहे. अखंड भारत असता, तर भारतीय सैन्यात किती मुसलमान असते ? त्यांची निष्ठा अखंड भारतासाठी राहिली असती कि त्यांनी बंड केले असते ? काँग्रेस पक्षाला सत्ता मिळवता आली असती कि अन्य कोणता पक्ष मोठा झाला असता ? आज पाक आणि बांगलादेश येथे जो हिंदूंचा वंशसंहार झाला आहे, तोही झाला नसता, हेही लक्षात घ्यायला हवे. आज भारतात असलेले मुसलमान तरी एकत्र आहेत का ? त्यांच्यातही मतप्रवाह आहे. भारतात एकही राष्ट्रीय पक्ष नाही, जो सर्व मुसलमानांना एकत्र आणू शकत आहे. मुसलमानांच्या नावाने हिंदूंचेच पक्ष आणि नेते राजकारण करत आले आहेत. अशी अनेक सूत्रे आहेत ज्यावर विचार करायला हवा. त्यामुळे महमूद सांगतात तसे झाले असते का ? याचे काही प्रमाणात उत्तर मिळू शकेल.

गांधी चुकलेच !

मोहनदास गांधी यांनी भारताच्या फाळणीला मान्यता दिली; कारण भविष्यात जे महमूद सांगतात, तशी मुसलमानांची लोकसंख्या वाढून भारतात अराजकाची स्थिती नेहमीच राहिली असती, असे त्यांना वाटत होते. जर हे सत्य मानले, तर ‘त्यांनी सर्व मुसलमानांना पाकिस्तानमध्ये जाण्यास का सांगितले नाही ? त्यांना भारतात का राहू दिले ?’, असे प्रश्न निर्माण होतात. त्या वेळी मुसलमान येथे राहिल्यामुळे आज जी स्थिती निर्माण झाली आहे, ती सध्या अराजकापेक्षा थोडी अल्प असली, तरी भविष्यात ती अराजकच निर्माण करणार, यात शंका नाही. सध्या असलेली त्यांची संख्या हिंदूंसाठी घातकच ठरत आहे. म्हणजेच गांधी यांचा विचार चुकीचाच होता, असे लक्षात येते.
हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

आमदार इकबाल महमूद यांच्या बोलण्यावरून लक्षात येते की, भारतातील मुसलमानांना भारतावर राज्य करायचे आहे. त्यांचे स्वप्न त्यांना जिहाद किंवा लोकशाही या मार्गांनी पूर्ण करायचे आहे. तेच त्यांच्या ओठावर येत आहे. याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे. भारतात आतापर्यंत मुसलमानांचे लांगूलचालन करणार्या पक्षांनी आणि त्यांच्या हिंदु नेत्यांनी सत्तेत असतांना जो काही कारभार केला, तो मुसलमानांच्या हितासाठी आणि हिंदूच्या विरोधातील असाच होता. आजही काही राज्यांमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, साम्यवादी यांचे सरकार आहे आणि तेथेही हीच स्थिती आहे. वर्ष २०१४ मध्ये हिंदूंनी जागे होऊन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर बसवले आणि काही प्रमाणात परिस्थिती पालटली. अनेक राज्यांत भाजपचे सरकार आले. त्यातही उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ आणि आसाममधील हिमंत बिस्व सरमा यांचे सरकार कठोरपणे धर्मांधांच्या विरोधात कारवाई करत हिंदूंसाठी काम करत आहे, असे दिसून येत आहे. असेच कार्य अन्य राज्यांतील भाजप सरकारांकडून झाले पाहिजे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे. हिंदूंना आता कळून चुकले आहे की, गेल्या ७८ वर्षांत सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदूंना मूर्ख बनवण्यात आले. हिंदूंचे अस्तित्व टिकवण्यासाठी भारतात हिंदुत्वनिष्ठ सरकार असणे आवश्यक आहे. त्याच्या पुढे जाऊन भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे, हे अत्यंत आवश्यक बनले आहे.
| भारताच्या फाळणीच्या वेळी सर्व मुसलमानांना पाकमध्ये न पाठवल्याने ते पंतप्रधानपदाचे स्वप्न पहात आहेत, हे लक्षात घ्या ! |
Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप
Islam Friendly Gym : केरळम्मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !