महाराष्ट्र कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हावर जर्सी गायीचे चित्र !

महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने नवीन बोधचिन्हामध्ये छापले देशी गायीऐवजी जर्सी गायीचे चित्र !

मुंबई, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशी गायीच्या संवर्धनाचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रानेही देशात सर्वप्रथम देशी गायीला राज्यमातेचा दर्जा दिला आहे; मात्र महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने नवीन बोधचिन्हामध्ये देशी गायीऐवजी जर्सी गायीचे चित्र छापले आहे. विभागाची ही कृती राज्याच्या धोरणाच्या विसंगत आहे. पंतप्रधान आणि राज्यशासन यांच्या देशी गायीच्या संवर्धनाच्या धोरणानुसार कृषी विभागानेही देशी गायीच्या संवर्धनाचा संदेश देणे अपेक्षित आहे.

या संदर्भात शासनाने काढलेला आदेश –

शेतीच्या उत्थनासाठी आणि कालसुसंगत असे स्वत:चे बोधचिन्ह अन् घोषवाक्य कृषी विभागाने प्रकाशित केले आहे. ‘कृषी कल्याण कर्तव्यम्’ हे विभागाचे नवीन घोषवाक्य आहे. विभागाकडून शासन निर्णयाद्वारे नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य घोषित केले आहे. बोधचिन्हावर हातावर असलेले रोप, ट्रॅक्टर आदी चिन्हे देण्यात आली आहेत. शासनाने देशी गायीच्या संवर्धनासाठी गोशाळांतील देशी गायींना प्रती गाय ५० रुपये अनुदान घोषित केले आहे. बोधचिन्ह आणि बोधवाक्य यांची संकल्पना उल्लेखनीय असली, तरी जर्सी गायीचे चित्र राज्यशासनाच्या धोरणाच्या विसंगत वाटते.