|

इटानगर (अरुणाचल प्रदेश) – पूर्व सियांग जिल्ह्यातील निगलोक सैनिकी शाळेतील इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या मृत्यूप्रकरणी मृत मुलाच्या बहिणीने वरिष्ठ विद्यार्थ्यांवर ‘रॅगिंग’चा आरोप केला आहे.
या प्रकरणी मृत विद्यार्थ्याची बहीण ताडू लुनियाने हिने सामाजिक माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात तिने म्हटले आहे की, ३१ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास १० वीचे ८ विद्यार्थी आणि ८ वीतील ३ विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात घुसले. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी ७ वीच्या विद्यार्थ्यांना धमकावले आणि तिच्या भावाला बलपूर्वक १० वीच्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात नेले. तिथे तिच्या भावाचा रात्रभर मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला.

लुनिया म्हणाली की, ‘सीसीटीव्ही फुटेज’मध्ये तिचा भाऊ सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्याच्या वसतीगृहाबाहेर दिसतो. थोड्याच वेळात तो एका रिकाम्या वर्गात गेला, जिथे त्याची ‘सुसाईड नोट’ (आत्महत्येच्या पूर्वी लिहिलेली चिठ्ठी) सापडली. त्यात लिहिले होते, ‘वरिष्ठांनी मला पुष्कळ त्रास दिला, आता काय करावे, हे मला कळत नाही.’
पीडितेची बहीण लुनिया हिने सांगितले की, वरिष्ठ विद्यार्थ्यांनी तिच्या भावाला ‘चोर’ म्हणून अपमानित केले होते आणि दुसर्या दिवशी व्हिडिओ दाखवून संपूर्ण शाळेसमोर त्याला अपमानित करण्याची धमकी दिली होती. १ नोव्हेंबरला ७ वीत शिकणार्या १२ वर्षांच्या या विद्यार्थ्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला. शाळेतील कर्मचार्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी ८ विद्यार्थ्यांना कह्यात घेतले असून या प्रकरणी अन्वेषण चालू केले आहे.
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात