|
(दुबार म्हणजे दोनदा आलेली)

मुंबई – महाविकास आघाडीचे नेते मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी केवळ हिंदु मतदारांची दुबार नावे सांगत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही राज्यातील ३१ मतदारसंघांतील मतदारसूची पडताळली. त्यामध्ये मुसलमानांची तब्बल २ लाख २५ सहस्र ७९१ दुबार नावे आढळली, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ३ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी आशिष शेलार यांनी मतदारसंघनिहाय मुसलमानांच्या दुबार नावांची आकडेवारी सांगितली.
याविषयी माहिती देतांना आशिष शेलार म्हणाले, ‘‘लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात २ कोटी ५० लाख १५ सहस्र ८१९ मते, तर महायुतीला २ कोटी ४८ लाख १२ सहस्र ६२७ मते मिळाली, म्हणजे महायुतीला २ लाख ३ सहस्र १९२ न्यून मते पडली. न्यून पडलेल्या मतांपेक्षा महाराष्ट्रातील ३१ मतदारसंघांतील मतदानसूचीतील मुसलमानांची दुबार नावे अधिक आहेत. लोकसभेच्या सर्व मतदारसंघांची पडताळणी केली, तर ही संख्या आणखी वाढेल. कर्जत-जामखेड मतदार संघात रोहित पवार (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) १ सहस्र २४३ मतांनी विजयी झाले. या मतदारसंघात मुसलमानांची ५ सहस्र ५६२ दुबार नावे आहेत. नाना पटोले (काँग्रेस) २०८ मतांनी निवडून आले. त्यांच्या मतदारसंघात मुसलमानांची ४७७ दुबार नावे आहेत. बीडमध्ये संदीप क्षीरसागर (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) ५ सहस्र ४२४ मतांनी निवडून आले. त्या मतदारसंघात मुसलमानांची १४ सहस्र ९४४ दुबार नावे आहेत. जितेंद्र आव्हाड (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या मतदारसंघात मुसलमानांची ३० सहस्र ६०१ नावे आहेत.
ज्योती गायकवाड (काँग्रेस) विजयी झालेल्या धारावी मतदारसंघात १० सहस्र ६८९, मुंब्रादेवीमध्ये अमीन पटेल (काँग्रेस) यांच्या मतदारसंघात मुसलमानांची ११ सहस्र १२५ नावे, सुनील राऊत (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विजयी झालेल्या विक्रोळी मतदारसंघात मुसलमानांची ३ सहस्र ४५० दुबार नावे आहेत. अशा प्रकारे अन्य मतदारसंघातही मुसलमानांची दुबार नावांची संख्या आशिष शेलार यांनी सांगितली. याविषयी मुख्य निवडणूक आयुक्तांची आम्ही अनेकदा भेट घेतली आहे.
संपादकीय भूमिकाही लोकशाही व्यवस्थेची थट्टाच आहे. या मागील षड्यंत्राचा शोध घेऊन सरकारने संबंधितांवर कारवाई करायला हवी ! |
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !