राज्य महिला आयोगाच्या हस्तक्षेपामुळे तक्रार प्रविष्ट

पुणे – वधू-वर आणि त्यांचे कुटुंबीय यांची आर्थिक फसवणूक करणारे ‘विवाह जुळवणारे जाळे’ उघडकीस आले आहे. या प्रकरणी ‘नाशिक येथील ‘शुभऋषि विवाह मंडळा’च्या संचालक प्रतिभा तरसे, विद्या देशपांडे आणि नीलेश वर्हाडे यांच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पीडित तक्रारदाराने ७ ते ८ महिने पाठपुरावा केल्यानंतर आणि राज्य महिला आयोगाने या तक्रारीची गंभीर नोंद घेऊन अहवाल मागवल्यानंतर अखेर पोलिसांना गुन्हा नोंद करणे भाग पडले. (पोलिसांनी नागरिकाची तक्रार प्रविष्ट करून गुन्हा का नोंदवला नाही ? एवढा पाठपुरावा का घ्यावा लागतो ? संबंधितांवर वरिष्ठ पोलीस काय कारवाई करणार आहेत ? – संपादक)
१. तक्रारदार अधिवक्ता राजेश बेल्हेकर हे मुलाच्या विवाहासाठी मुलगी शोधत होते. त्या वेळी त्यांना ‘शुभऋषि विवाह मंडळा’चे विज्ञापन दिसले.
२. विवाह मंडळाशी संपर्क केल्यानंतर त्यांनी काही वधूंची माहिती आणि छायाचित्रे दिली. त्यासाठी ३ सहस्र ५०० रुपये म्हणून वार्षिक वर्गणी भरण्यास सांगितले.
३. पैसे भरल्यानंतर विद्या देशपांडे यांनी वधूंचे संपूर्ण पत्ते, संपर्क क्रमांक देण्यास टाळाटाळ केली. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी काही पत्ते दिले.
४. दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क केला असता ते पत्ते आणि छायाचित्रे खोटी असल्याचे निदर्शनास आले. ते विविध वेगवेगळ्या नावांनी वर्तमानपत्रांमध्ये विज्ञापन देत आर्थिक फसवणूक करत असल्याचे लक्षात आले.
संपादकीय भूमिका :लोकांची गंभीर फसवणूक होऊनही तत्परतेने गुन्हे नोंद न करणार्या पोलीस प्रशासनाने जनतेचा विश्वास गमावला आहे ! |
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !