नवी मुंबई – सावरकर विचार मंच आणि मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळ यांच्या वतीने ‘अज्ञात सावरकर’ या विषयावर वाशी येथे १४ नोव्हेंबर या दिवशी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. लेखक आणि सावरकर चरित्र अभ्यासक योगेश सोमण हे व्याख्याते म्हणून उपस्थित असणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ सभागृह सेक्टर ६, वाशी येथे हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार आहे.
मंचाचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी सांगितले की, क्रांतीकारक सावरकर सर्वांना ज्ञात आहेत; परंतु राष्ट्रीय सुरक्षा, विदेशनीती याविषयीचे द्रष्टे सावरकर अजूनही अज्ञात आहेत. त्यांनी या देशाची सुरक्षा आणि त्याला असलेले भविष्यकालीन धोके काळाआधीच सांगितले होते. गेल्या १० वर्षांतील सध्याच्या सरकारच्या संरक्षण, अंतर्गत सुरक्षा आणि परराष्ट्रधोरण यांवर सावरकरांचा गाढा प्रभाव दिसून येतो. सावरकरांच्या व्यक्तीमत्त्वाचे दुर्लक्षित पैलू योगेश सोमण व्याख्यानातून उलगडतील.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी