
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राष्ट्रीय सुरक्षा आणि संस्कृती रक्षण या उद्देशाने १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी देहलीतील ‘भारत मंडपम्’ येथे आयोजित केल्या जाणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले. ‘अपना दल’चे आमदार आर्.के. पटेल, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सचिव श्री. चंपत राय, ‘गोल्डी मसाले’ आस्थापनाचे मालक श्री. सुरेंद्र गुप्ता, उत्तरप्रदेश सरकारचे संयुक्त सचिव श्री. शशिकांत शुक्ला, भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी आणि ‘ब्रह्मसागर’ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन एस्.के. द्विवेदी, सुप्रसिद्ध उद्योजक इंद्रमोहन आनंदा आदी अनेक मान्यवरांना महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले.

या सर्वांनी ‘आम्ही महोत्सवात नक्की सहभाग घेऊ’, असे आश्वासन दिले. या वेळी महोत्सवाच्या निमंत्रण समितीच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि समितीचे उत्तरप्रदेश अन् बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी उपस्थित होते.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !