|

संभल (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील संभल जिल्ह्यातील अहमदनगर थरैसा गावात दिवाळीच्या, म्हणजेच २१ ऑक्टोबरच्या रात्री फटाके फोडण्यावरून हिंदु आणि मुसलमान समुदायांमध्ये वाद झाला. दोन्ही समुदायांतील लोक समोरासमोर आले आणि दगडफेक चालू झाली. या घटनेत अनुमाने ६ जण घायाळ झाले. गावातील तणावाच्या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा आणि सुरक्षादलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
Clashes erupt between Hindus and Muslims in Sambhal (Uttar Pradesh) over Diwali firecrackers
Six injured in stone-pelting
Police and security forces deployed in the village https://t.co/inDz1G6jSD— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 24, 2025
दिवाळीच्या रात्री अनुमाने ८ वाजण्याच्या सुमारास अहमदनगर थरैसा गावातील धर्मपाल जाटव यांच्या घरी दिवाळीनिमित्त फटाके फोडले जात होते. त्या वेळी मुसलमान समुदायातील सादिक नावाचा मुलगा ते पहाण्यासाठी आला होता. तेव्हा तेथे मुलांमध्ये वाद झाला आणि तो वाद वाढून हिंदु-मुसलमान कुटुंबियांमध्ये भांडण चालू झाले. काही वेळातच दोन्ही बाजूंनी दगडफेक चालू झाली. गावात दोन समुदायांमध्ये वाद निर्माण झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोजकुमार वर्मा पोलीस पथकासह घटनास्थळी पोचले. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही बाजूंना शांत केले.
संपादकीय भूमिकादंगलखोर धर्मांध ! |
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !