
पुणे – कर्वेनगर येथील एका नामांकित मुलींच्या शाळेत दाखला घ्यायला आलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीचा भ्रमणभाष क्रमांक घेऊन तिला अश्लील संदेश पाठवणार्या शाळेतील शिपाई अनिल बावधने याच्यावर कर्वेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास जाणूनबुजून विलंब केला असल्याची तक्रार पीडितेने केली आहे. (पोलिसांनी याविषयी स्पष्टीकरण देणे आवश्यक ! – संपादक) संस्थेच्या सचिवांनी संबंधित शिपायाला निलंबित केल्याचे सांगितले. त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.
या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यास विलंब होत असल्याने ‘पतित पावन संघटने’ने कर्वेनगर पोलीस ठाण्यासमोर आणि शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. त्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास नकार दिला.
१. २१ वर्षीय तरुणी दाखल्यासाठी शाळेत आली होती. त्या वेळी मुख्याध्यापिका नसल्याने दाखल्यावर स्वाक्षरी झाली नाही.
२. आरोपी बावधने याने तिचा भ्रमणभाष क्रमांक घेऊन ‘स्वाक्षरी झाल्यानंतर कळवतो’, असे सांगितले.
३. त्यानंतर त्याने पीडित तरुणीला अश्लील संदेश पाठवून त्रास दिला.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !