१३ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजता देवल क्लब, कोल्हापूर येथे ‘‘भगव्या आतंकवादा’चा खोटा प्रचार – मग सत्य काय?’ हा विशेष कार्यक्रम होणार !

कोल्हापूर, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – वर्ष २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बाँबस्फोटानंतर हिंदुत्वनिष्ठांवर अन्याय्य कारवाई करून ‘भगवा आतंकवाद’ असा खोटा अपप्रचार करण्यात आला होता. ३१ जुलै २०२५ या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील सर्व ७ हिंदु आरोपींना निर्दोष मुक्त केले आणि न्यायप्रणालीने खर्या अर्थाने सत्याला विजय मिळवून दिला.
पण प्रश्न अजूनही उरतो की, ‘भगवा आतंकवाद’ हा खोटा प्रचार कुणी, का आणि कशासाठी केला ? त्या मागील षड्यंत्राचे धागेदोरे कोणते ? या सर्व प्रश्नांना उत्तर देणारा विशेष कार्यक्रम १३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता देवल क्लब, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात मालेगाव प्रकरणातील निर्दोष धर्मवीर समीर कुळकर्णी आणि मेजर रमेश उपाध्याय यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

१. या प्रकरणातील हिंदु विधीज्ञ परिषदचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदु विधीज्ञ परिषदचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. विक्रम भावे यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित रहाणार आहेत.
२. या विशेष कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, तसेच राज्याचे पालकमंत्री मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्यासह असंख्य हिंदुत्वनिष्ठ संघटना, गडदुर्गप्रेमी, शिवप्रेमी, संप्रदाय, मंडळे, सामाजिक संघटना यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. निमंत्रणपत्रिका आणि होर्डिंग्जच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार चालू आहे. ‘भगवा आतंकवाद’, या अपप्रचारामागचे सत्य समजून घेण्यासाठी आणि निर्दोष ठरलेल्या धर्मयोद्धयांचा गौरव करण्यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रप्रेमी नागरिक, शिवभक्त, तरुण आणि समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. सुनील घनवट यांनी केले आहे.
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांकडून अभिवादन !
भडगाव (जिल्हा जळगाव) येथे युरियासमवेत अन्य रासायनिक खते घेण्याची शासकीय कृषी केंद्रांतून सक्ती !
मुणगे येथे अणूऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध