Passenger Dies Non-Veg Food : शाकाहारी ऐवजी मांसाहारी जेवण दिल्याने प्रवाशाचा मृत्यू !

AI निर्मित प्रतिकात्मक चित्र

कोलंबो (श्रीलंका) – ‘कतार एअरवेज’च्या विमानात मांसाहारी जेवण खाल्यामुळे ८५ वर्षीय हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक जयवीर यांचा मृत्यू झाला. डॉ. जयवीर यांनी शाकाहारी जेवण मागवले होते; परंतु त्यांना मांसाहारी जेवण देण्यात आले.

ते जेवण खाल्ल्यामुळे त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. डॉ. जयवीर यांच्या मुलाने कतार एअरवेजविरुद्ध मनुष्यवध आणि वैद्यकीय निष्काळजीपणा केल्यावरून खटला प्रविष्ट (दाखल) करत १ कोटी १५ लाख रुपयांची हानीभरपाई मागितली आहे.