अधिवक्त्याने म्हटले, ‘सनातनचा अपमान सहन करणार नाही !’

नवी देहल: सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर एका अधिवक्त्याने न्यायालयातच सुनावणी चालू असतांना बूट फेकण्याचा प्रयत्न केला. हा अधिवक्ता न्यायमूर्ती बसतात त्या मंचावर गेला, त्याने त्याचा बूट काढला आणि सरन्यायाधिशांवर फेकण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी न्यायालयाच्या सुरक्षा कर्मचार्यांनी त्याला पकडले आणि त्याला बाहेर घेऊन गेले. न्यायालयातून बाहेर पडतांना अधिवक्त्याने घोषणा देत म्हटले, ‘आम्ही सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.’
Attempt to throw a shoe at CJI BR Gavai!
A lawyer tried to hurl a shoe at the Chief Justice, shouting —
🗣️ “Will not tolerate the insult of Sanatan!”🔸 The protest follows The CJI's controversial remark on the petition to replace the broken Bhagwan Vishnu idol in Khajuraho… https://t.co/2mb3Muq48D pic.twitter.com/AtsD0wK83M
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 7, 2025
मला अशा गोष्टीने काही फरक पडत नाही ! – सरन्यायाधीश
या घटनेनंतर सरन्यायाधिशांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या अधिवक्त्यांना त्यांचा युक्तीवाद चालू ठेवण्यास सांगितले. ते म्हणाले की, अशा गोष्टीने मला काही फरक पडत नाहीत.
भगवान विष्णूच्या मूर्तीविषयी केलेल्या विधानामुळे विरोध झाल्याचा दावा
मध्यप्रदेशातील खजुराहो येथे भगवान विष्णूच्या ७ फूट उंच खंडित मूर्तीला हटवून तेथे नवीन मूर्ती स्थापित करण्याच्या संदर्भातील याचिकेवर काही दिवसांपूर्वी सुनावणी करतांना सरन्यायाधीश गवई यांनी याचिकाकर्त्याची याचिका फेटाळत म्हटले होते, ‘जा आणि देवाला ते स्वतः करायला सांगा. तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त असल्याचा दावा करता, जा आणि त्याला प्रार्थना करा.’ या घटनेमुळेच बूट फेकण्याचा प्रयत्न अधिवक्त्याने केल्याचा दावा केला जात आहे. ↓ हे वाचा ↓ |

‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !