१० नोव्हेंबरला पुढील सुनावणी

छत्रपती संभाजीनगर : शनिशिंगणापूरमधील ‘श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट’वर प्रशासक नियुक्तीविषयी ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपिठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांनी ४ ऑक्टोबर या दिवशी दिला. खंडपिठाने प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचा आदेशही दिला असून ४ नोव्हेंबरपर्यंत त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी १० नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.
राज्यशासनाने वर्ष २०१८ मध्ये श्री शनैश्वर देवस्थान कायदा सिद्ध केला होता. त्याची कार्यवाही २२ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून करण्यात आली. राज्यशासनाने त्याच दिवशी देवस्थान कायद्याच्या कलम ३६ नुसार अहिल्यानगरच्या जिल्हाधिकार्यांची देवस्थानावर प्रशासक म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीला विश्वस्त भगवान बनकर आणि इतर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. याचिकार्त्यांच्या वतीने अधिवक्ता सतीश तळेकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, निवडून आलेल्या विश्वस्तांचा कार्यकाळ डिसेंबर २०२५ पर्यंत आहे. शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता न्यासावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे.
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !