१. ‘इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या आई-मुलाच्या जोडीने एल्.टी.टी.ई.ला सर्व प्रकारे साहाय्य केले होते’, हे स्पष्टपणे सांगणारे पुस्तक !
‘एल्.टी.टी.ई.’चे आतंकवादी आणि त्याचा भयंकर प्रमुख वेलुप्पिल्लई प्रभाकरन् यांचा पाडाव सुनिश्चित करणार्या महत्त्वाच्या काळात श्रीलंकेच्या नौदलाचे नेतृत्व करणारे द्वीपराष्ट्रांचे पहिले नौदलप्रमुख वसंथ करन्नागोडा यांनी लिहिलेले ‘द टर्निंग पॉईंट-द नेव्हल रोल इन श्रीलंकाज वॉर ऑन एल्.टी.टी.ई. टेररिझम’ हे पुस्तक वाचल्यानंतर मला भारताचे माजी फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची आठवण येते. (टीप : या लेखात फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्याविषयीची माहिती चौकटीत दिली आहे.) वसंथ करन्नागोडा हे त्यांच्या नेतृत्वगुणांसाठी ओळखले जातात. त्यांनी योग्य कामासाठी योग्य व्यक्ती निवडल्या होत्या. आतंकवाद्यांना शस्त्रे देऊन आणि देशाच्या भूमीवर प्रशिक्षण देऊन शस्त्रसज्ज करून एल्.टी.टी.ई. संघटनेला पाठिंबा देणारे तत्कालीन भारत सरकार कधीही पाप लपवू शकत नाही. ‘वर्ष १९८० ते १९९० या दशकात नवी देहली येथील सत्ताधारी सरकारने प्रभाकरन् आणि त्याच्या साथीदारांचे संगोपन केले आणि त्यांना बळ दिले’, हे भारतातील राजकीय अन् सुरक्षा वर्गामध्ये (खासगीरित्या) ठाऊक असले, तरी कुणीही ते उघडपणे सांगितले नाही. ‘इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या आई-मुलाच्या जोडीने ‘एल्.टी.टी.ई.’ला सर्व प्रकारे साहाय्य केले होते’, हे वसंथ करन्नागोडा यांनी स्पष्टपणे मांडले आहे.

२. ‘खलिस्तान हे स्वतंत्र शीख राष्ट्र असावे’, ही मागणी, म्हणजे इंदिरा गांधी यांच्या क्रूर राजकीय खेळीचे फलित !
भारतात स्वतंत्र शीख राष्ट्र हवे असलेले खलिस्तानी हे शिखांच्या अनेक घटकांमध्ये विभाजन करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी राबवलेल्या क्रूर राजकीय खेळीचे फलित आहे. जर्नेल भिंद्रनवालेचे मित्र त्याच्या अस्तित्वाचे श्रेय इंदिरा गांधी यांना देतात. खलिस्तानी आतंकवाद हा राक्षसी प्रवृत्तीचा असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याने इंदिराजींचा जीव घेतला. शीख भारताच्या विरोधात शस्त्रे उचलतील, हे आजही अकल्पनीय आहे; कारण शिखांविना भारताचा विचार करणे अशक्य आहे. शौर्य, देशभक्ती आणि धाडस यांचे ते प्रतीक आहेत.
३. संरक्षण मुख्यालयाच्या धोरणाविषयी एल्.टी.टी.ई.ला आधीच पूर्वसूचना मिळाल्याने नौदलाला आलेल्या अडचणी !
करन्नागोडा यांच्या पुस्तकातील संदर्भानुसार श्रीलंकेचे नौदल ‘एल्.टी.टी.ई.’च्या वाईट हेतूंविषयी भिंतीवर लिहिलेले लिखाण पहाण्यास पुरेसे सक्षम नव्हते. ‘एल्.टी.टी.ई.’ने श्रीलंकेच्या सैन्याविरुद्ध चालू केलेले युद्ध हा करन्नागोडा यांच्यासाठी एक नवीन अनुभव होता. श्रीलंकेचे तत्कालीन अंतर्गत संरक्षण मंत्री ललित अतुलथमुदाली आणि जनरल तिसा वीरतुंगा या श्रीलंकेच्या २ पुत्रांचे मत होते, ‘बेटावरील राष्ट्राचे सैन्य हे एक औपचारिक सैन्य आहे.’ इस्टर्न विंगचे कमांडर म्हणून पदभार स्वीकारणारे करन्नागोडा म्हणतात, ‘नौदलात, तसेच नौदल मुख्यालयात आत्मसंतुष्टतेची भावना निर्माण झाली होती. संरक्षण मुख्यालयात अनेक स्तंभलेखक होते आणि यामुळे आतंकवाद्यांना पकडण्यासाठी देशाच्या नौदल कमांडरांनी सिद्ध केलेल्या धोरणांविषयी आगाऊ माहिती एल्.टी.टी.ई.ला मिळण्यास साहाय्य झाले.’
४. प्रभाकरन् याला वाचवण्यासाठी त्यास साहाय्य करण्याचे धोरण ठेवून भारतीय वायूदलाने केलेल्या कृतींविषयी करन्नागोडा यांचा खुलासा !
करन्नागोडा यांचा इतिहास एखाद्या आश्चर्यकारक घटनांनी भरलेल्या हॉलीवूड युद्ध चित्रपटाच्या पटकथेसारखा वाटतो. ‘वर्ष १९८७ मध्ये भारतीय वायू दलाने मानवतावादी साहाय्य करण्याचे निमित्त करून जाफना द्वीपकल्पात अन्न आणि शिधा विमानाने खाली टाकण्याची केलेली कारवाई ही प्रभाकरन्ला श्रीलंकेच्या सैन्याकडून पकडले जाण्यापासून किंवा ठार होण्यापासून वाचवण्यासाठी केली होती’, हा त्यांचा खुलासा धक्कादायक होता. ‘मिराज २०००’ लढाऊ विमानांसह सैनिकी वाहतूक विमानांनी साहाय्यासाठीचे २५ टन साहित्य जाफनाला वाहून नेणार्या ‘ऑपरेशन पुमलाई’ नावाच्या मोहिमेचा उद्देश केवळ द्वीपकल्पातील ‘एल्.टी.टी.ई.’च्या वेढलेल्या कार्यकर्त्यांना साहाय्य करणे, हा होता. मुत्सद्देगिरीच्या सर्व निकषांचे हे उघड उल्लंघन होते.
या गदारोळाच्या काळात जर प्रभाकरन् पकडला गेला असता अन् त्याला फाशी देण्यात आली असती, तर श्रीलंका आणि भारत या दोन्ही देशांना आपत्तींचा सामना करावा लागला नसता. इंदिराजींचा खलिस्तानी आतंकवाद्यांच्या गोळ्यांमुळे मृत्यू झाला, तर १९८४ ते १९८९ या कालावधीतील पंतप्रधान राजीव गांधी यांची एल्.टी.टी.ई.च्या कार्यकर्त्यांच्या आदेशानुसार वागणार्यांनी हत्या केली.
५. सैनिकांनी ‘दी टर्निंग पॉईंट’ हे पुस्तक वाचणे आवश्यक !
‘टर्निंग पॉईंट’चे वर्णन एल्.टी.टी.ई.च्या राजवटीचा एक शक्तीशाली इतिहास म्हणून केले जाऊ शकते आणि आतंकवादी संघटनांशी लढणारे सैनिक अन् सुरक्षारक्षक यांनी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे. एल्.टी.टी.ई. विरुद्धच्या युद्धाच्या वेळी आलेले अनुभव करन्नगोडा यांनी भावी पिढ्यांसाठी सांगितले आहेत. एल्.टी.टी.ई. किंवा हमास किंवा इस्लामी स्टेटसारख्या संघटनांवर कधीही विश्वास ठेवू नये; कारण आपण कधीही आतंकवाद्यांच्या किंवा प्रभाकरन् याच्यासारख्या स्वयंघोषित नेत्यांच्या वाईट विचारांविषयी निश्चिती बाळगू शकत नाही. या स्पष्ट कारणांसाठी मानवतेने वसंथ करन्नगोडाचे आभार मानले पाहिजेत.’
– श्री. कुमार चेल्लपन, ज्येष्ठ पत्रकार, केरळ.
पुस्तक परीक्षण !

पुस्तकाचे नाव
द टर्निंग पॉईंट-द नेव्हल रोल इन
श्रीलंकाज वॉर ऑन एल्.टी.टी.ई. टेररिझम
लेखक : वसंथ करन्नागोडा, प्रकाशक : पेंग्विन बुक्स
‘ॲमेझॉन’ संकेतस्थळाची लिंक –
https://www.amazon.com/Turning-Point-Naval-Lankas-Terrorism/dp/0143469290
भारतीय सैन्याच्या इतिहासात स्वतःचा ठसा उमटवणारे ‘फील्ड मार्शल’ सॅम माणेकशॉ !
‘एस्.एच.एफ्.जे. माणेकशॉ (शामशेरजी होरमुसजी फ्रॉमजी जमशेदजी माणेकशॉ) (जन्म १९१४ – मृत्यू २००८) हे स्वातंत्र्यानंतरच्या काळातील भारतातील सर्वांत लोकप्रिय सैनिक होत. त्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी, मित्र आणि सहकारी त्यांना ‘सॅम बहादूर’ या नावाने संबोधत. माणेकशॉ हे भारताचे पहिले ‘फील्ड मार्शल’ होते. भारतीय सैन्याच्या इतिहासात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. वर्ष १९७१ मधील युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळवलेल्या चमत्कारिक विजयामुळे लोक आश्चर्यचकित झाले होते. या युद्धाचा परिणाम, म्हणजे बांगलादेशाची निर्मिती झाली. ख्यातनाम वक्ते असलेले फिल्ड मार्शल माणेकशॉ यांनी देशभरातील भाषणांमधून नेता बनवण्यासाठी व्यावसायिक ज्ञान आणि क्षमता या २ महत्त्वाच्या घटकांविषयी सांगितले आहे. सॅम माणेकशॉ यांनी हे जग सोडले असले, तरी त्यांची भाषणे आणि त्यांच्या समकालीन लोकांच्या आठवणी या प्रसिद्ध सैनिकाविषयी बरेच काही सांगतात.

पंतप्रधानांसमोर ‘सध्याची परिस्थिती युद्धाला अनुकूल नाही’, असे रोखठोक मत मांडणारे सैन्यप्रमुख माणेकशॉ !
एप्रिल १९७० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय सैन्याचे ‘चीफ ऑफ स्टाफ’ असलेले माणेकशॉ यांना मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी बोलावले. या वेळी गांधी यांनी माणेकशॉ यांना ‘पाकिस्तानी सैन्याने केलेले हत्याकांड अन् बलात्कार यांमुळे आसाम, त्रिपुरा अन् बंगाल या ईशान्येकडील राज्यांमध्ये आश्रय घेतलेल्या पूर्व पाकिस्तानातील ९० लाख निर्वासितांविषयी ते काय करणार आहेत ?’, असे विचारले. इंदिरा गांधी म्हणाल्या, ‘या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निर्वासितांचा ओघ थांबवण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी काहीतरी करण्याची मला विनंती केली आहे. जनरल, याविषयी तुम्ही काय करणार आहात ?’ यावर सॅम माणेकशॉ उत्तरले, ‘मी निश्चितपणे काही करणार नाही.’ त्यावर इंदिरा गांधी यांनी ‘मला शत्रूच्या प्रदेशात घुसून लवकरात लवकर युद्ध करायचे आहे’, असे म्हटले. तेव्हा आपला संयम न सोडता माणेकशॉ म्हणाले, ‘तुम्ही बायबल वाचले आहे
का ?’ त्यावर पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या, ‘बायबलचा युद्धाशी काय संबंध आहे ?’ त्यावर माणेकशॉ म्हणाले, ‘‘बायबलच्या प्रारंभिक अध्यायात म्हटले आहे की, देवाने आदेश दिला, ‘प्रकाश होऊ द्या’ आणि प्रकाश झाला. त्यानंतर त्याने त्या क्रमाने प्रकट होणारे पाणी, हवा आणि निसर्ग असावेत, असा आदेश दिला. तुम्ही केवळ युद्ध होऊ देण्याचा आदेश देऊ शकत नाही; कारण सध्याची परिस्थिती संपूर्ण युद्धासाठी अनुकूल नाही.’ आपल्या सैनिकी सेनापतीच्या तडजोड न करण्याच्या भूमिकेमुळे चकित झालेल्या इंदिरा गांधी यांनी त्यांना युद्धास नकार देण्याचे कारण विचारले. तेव्हा माणेकशॉ यांनी आगामी मोसमी वारे, पूर्व भारतातील कापणीचा हंगाम आणि हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे निश्चितपणे पूर येण्याची शक्यता, यांसह भौगोलिक परिस्थितीचे तपशीलवार वर्णन केले. ते म्हणाले, ‘सैन्याच्या हालचालींसाठी गाड्या आणि ‘वॅगन’ यांची आवश्यकता असून यासाठी सैन्याला रस्ते कह्यात घ्यावे लागतील. यामुळे कापणी केलेल्या पिकांची वाहतूक करणे अशक्य होईल. याखेरीज जर आपण या टप्प्यावर युद्ध पुकारले, तर आपला १०० टक्के पराभव होईल, याची मी तुम्हाला हमी देतो.’
मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित असलेले इतर लोक शांतपणे ऐकत होते; कारण सैन्यप्रमुखांनी कोणत्याही कागदपत्रांच्या साहाय्याविना वस्तूस्थिती सांगितली. या वेळी गोंधळलेल्या पंतप्रधानांनी ‘मंत्रीमंडळाची बैठक पुन्हा दुपारी ४ वाजता होईल’, असे सांगितले. सर्व मंत्री बाहेर पडत असतांना पंतप्रधान गांधी यांनी माणेकशॉ यांना थांबण्यास सांगितले. त्यावर माणेकशॉ पंतप्रधानांना म्हणाले, ‘तुम्ही माझ्या बडतर्फीचे आदेश देण्यापूर्वी मीच ‘माझ्या शारीरिक आजारांमुळे किंवा मानसिक विसंगतीमुळे मला माझ्या पदावरून मुक्त करा’, अशी विनंती करणारे माझे त्यागपत्र पाठवू का ?’ यावर पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या, ‘तुम्ही केलेल्या विश्लेषणाविषयी तुम्ही गंभीर आहात, असे दिसते. त्यामुळे मी सर्व काही तुमच्यावर सोडत आहे.’ माणेकशॉ यांच्या मार्गदर्शनाखाली सैन्याने वर्ष १९७१ मधील युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला आणि बांगलादेशाची निर्मिती केली. त्यानंतरचा इतिहास आपल्यासमोर आहे. माणेकशॉ यांच्या मार्गदर्शनाखाली सैन्याने या मोहिमेचे नियोजन आणि कार्यवाही केली अन् परिणामी बांगलादेश या नव्या देशाचा जन्म झाला. माणेकशॉ यांनी हा विजय भारतीय सैनिकांना समर्पित केला. नेतृत्वगुण प्राप्त करण्यासाठी व्यावसायिक ज्ञान आवश्यक आहे. ‘एक नेता म्हणून उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी व्यावसायिक क्षमता असणे आवश्यक आहे’, असे माणेकशॉ यांनी त्यांच्या एका भाषणात सांगितले.’
– श्री. कुमार चेल्लपन, ज्येष्ठ पत्रकार, केरळ.

उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !