
तुळजापूर, २९ सप्टेंबर – शारदीय नवरात्रोत्सवात २९ सप्टेंबर (आठव्या माळेच्या) दिवशी श्री तुळजाभवानीदेवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मोठ्या भक्तीभावाने बांधण्यात आली. सकाळपासूनच मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी होती. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य रक्षणासाठी श्री तुळजाभवानीदेवीने प्रसन्न होऊन स्वतःच्या हाताने भवानी तलवार दिली. त्या तलवारीच्या आशीर्वादाने स्वराज्याची स्थापना शक्य झाली, अशी भक्तांची धारणा आहे. हाच परंपरेचा वारसा जपण्यासाठी प्रतिवर्षी नवरात्रोत्सवात भवानी तलवार अलंकार महापूजा मोठ्या श्रद्धेने केली जाते.
२८ सप्टेंबरच्या रात्री श्री तुळजाभवानीदेवीची अश्वारूढ ‘छबिना’ मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या मिरवणुकीत जिल्हाधिकारी आणि ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’चे अध्यक्ष श्री. किर्ती किरण पुजार हे सपत्नीक सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ‘जय भवानी’च्या उद्घोषात मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता.
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !