चहाचे दुष्परिणाम

१. दिवसाला ५ ते १० कप इतक्या प्रमाणात अतीउकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी, मलावरोध असे अनेक विकार होतात.

२. भारतियांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठे काम करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कॉलेस्ट्रॉल, हृदयविकार, स्थौल्य अशा विकारांकडे ओढले जात आहेत.

३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ, रक्तदाब वाढणे, पक्षाघात यांसारखे विकार आणि शुक्राणूंची संख्या न्यून होणे, असे विकार बळावतात.

वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर

४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ, पित्त अन् वात वाढवणारा, तसेच उष्ण गुणाचा आहे.

५. टपरीवर चहा ॲल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. ॲल्युमिनियमच्या धातूचा खाद्य पदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘स्मृतीनाश’सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.

६. चहा दिवसाला २ वेळेस प्यायल्यास (१० रुपयाचा एक चहा) वर्षाचे ७३०० रुपये होतात. तेवढ्या रुपयांची हानी केल्यासारखे आहे.

७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात चहा हे कधीही, केव्हाही पुष्कळ प्यायचे पेय नाही.

८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही, हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे, हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.

९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

१०. चहासह आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील साखर आणि दूध यांच्याशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला मारक बनतो.

११. चहा हा दारू इतकाच घातक आहे आणि त्याचे गंभीर परिणाम दारू इतकेच शरिराला अपायकारक आहेत.,(२४.९.२०२५)

– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पंचम आयुर्वेद, पुणे.