जळगाव येथे निषेध म्हणून पाकिस्तानच्या झेंड्याची रांगोळी पायदळी तुडवण्याचे प्रकरण !

जळगाव – नवरात्रीच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध तालुक्यातील अनेक गावांमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून श्री दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहाने काढली जाते. दौडीच्या वेळी निषेधार्ह म्हणून पाकिस्तानच्या झेंड्याची रांगोळी काढून ती पायदळी तुडवण्यात येते; पण चोपडा, यावल, जळगाव शहर येथे काही पोलीस अधिकार्यांनी या प्रथेला विरोध केला. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ आणि देशभक्त नागरिक संतप्त झाले. अनेकांनी त्याचा तीव्र निषेध केला, तसेच निवेदने दिल्याने प्रशासनाने संबंधित अधिकार्यांना योग्य ती समज दिली.
१. सर्वप्रथम जिल्ह्यातील चोपडा येथे स्थानिक पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी पाकिस्तानच्या झेंड्याची रांगोळी पाहून तेथील महिला आणि दौडीत सहभागी धारकरी यांना अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. (महिलांना शिवीगाळ करणारे स्थानिक पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना बडतर्फच केले पाहिजे ! – संपादक) महिला आणि धारकरी, तसेच शहरातील हिंदुत्वनिष्ठ यांनी साळवे यांच्यावर कारवाईची मागणी करत चोपडा येथील पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन केले.
२. यावल येथेही अशी रांगोळी स्थानिक पोलीस निरीक्षक रघुनाथ धारभाळे यांनी नगर पालिकेच्या कर्मचार्यांना सांगून धुवायला सांगितली. यावरून धारकरी आणि धारभाळे यांच्यात वाद झाला.
३. जळगाव शहरातील कांचननगर भागात अशीच रांगोळी काढल्यावरून स्थानिक पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी येथील ३२ वर्षीय महिलेला नोटीस बजावली. (अशा प्रकारे अन्य धर्मियांना नोटीस बजावण्याचे पोलिसांचे धाडस तरी होते का ? – संपादक) त्यात ‘पाकिस्तानच्या ध्वजाच्या रांगोळीमुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावून अपप्रकार झाल्यास आपल्याला उत्तरदायी धरून गुन्हे नोंद केले जातील’, असे नमूद करण्यात आले होते.
या सर्व घटनांमुळे हिंदुत्वनिष्ठ आणि देशभक्त नागरिक संतप्त झाले. ‘पाकिस्तानच्या झेंड्याची जळगाव पोलिसांना एवढी काळजी का ?’ असा प्रश्न सामाजिक माध्यमांतून विचारला जाऊ लागल्याने पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी याची नोंद घेतली. हिंदुत्वनिष्ठांचे म्हणणे समजून घेऊन त्यांनी संबंधित अधिकार्यांना समज दिली. निष्पाप महिलांना दिलेली नोटीस मागे घेतली. (हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर दिली जाणारी समज म्हणजे सारवासारवी करण्याचाच प्रकार होय ! – संपादक)
संपादकीय भूमिकापोलिसांना पाकच्या झेंड्याचा इतका कळवळा का ? असे पाकधार्जिणे पोलीस भारतात हवेच कशाला ? |
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा