
ठाणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांतील पदाधिकार्यांच्या भेटी घेतल्या. त्या वेळी ‘शहाड’ रेल्वेस्थानकाचा नामफलक पाहिला. त्याच्या खाली हिंदीत ‘शहद’ असे लिहिले होते. ते म्हणाले, ‘‘शहाडचे हिंदी शहाडच होईल ना ?’’ त्यांनी कार्यकर्त्यांना ते पालटण्याचा आदेश दिला. कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र देत नाव पालटण्याची विनंती केली. प्रशासनाने रेल्वे स्थानकावरील ‘शहद’ नावाचा उल्लेख पुसून तेथे ‘शहाड’ केले. (रेल्वे प्रशासनाने राज्यात अन्य ठिकाणच्या रेल्वेस्थानकांवर हिंदी भाषेतील चुकीचे उल्लेख नाहीत ना, याची पडताळणी करावी ! – संपादक)
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद