
पुणे – येथील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना विविध शारीरिक त्रास आणि वाहतूककोंडी यांना सामोरे जावे लागते. वेळोवेळी याविषयी तक्रार करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते; मात्र आता पुण्यातील रस्त्यावरील खड्डयांची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. पुणे महापालिकेने नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार करता यावी आणि ते तातडीने बुजवले जावेत, यासाठी ‘रोडमित्र’ नावाचे ‘ॲप’ सिद्ध केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेकडो खड्डे बुजवले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे; पण वस्तूस्थितीत केवळ ‘ॲप’वर येणार्या खड्ड्यांच्या तक्रारीच्या संदर्भातच कारवाई होते. इतर खड्डे बुजवले जात नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
संपादकीय भूमिका :
|
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
राजस्थान : ३८ गोशाळांनी अधिक गोवंश दाखवून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटले !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !