
१. शैलपुत्री – साधेपणा आणि दृढता
१ अ. आध्यात्मिक मोठा वारसा लाभून आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी असूनसुद्धा साधे रहाणीमान असणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ! : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आध्यात्मिक वारसा लाभला आहे. त्यांचे आई-वडील (सनातनच्या ९१ व्या संत पू. (श्रीमती) हिरा मळये, वय ८९ वर्षे आणि सनातनचे ९२ वे संत पू. (कै.) वसंत मळये), पती (सद्गुरु नीलेश सिंगबाळ, वय ५८ वर्षे) आणि सासूबाई (सनातनच्या ११७ व्या संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ, वय ८५ वर्षे), हे सर्व जण संत आहेत. जशी शैलपुत्री पर्वतराजाची कन्या असूनही शांत आणि स्थितप्रज्ञ आहे, तशाच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी असूनसुद्धा त्यांचे वागणे, बोलणे आणि रहाणीमान एखाद्या सामान्य साधकाप्रमाणे अगदी साधे आहे.
२. ब्रह्मचारिणी – साधनेसाठी समर्पित
२ अ. गुरुकार्याला समर्पित झालेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ! : ज्याप्रमाणे ब्रह्मचारिणीदेवीने अत्यंत कठोर तप करून शिवाला प्राप्त केले, त्याच प्रकारे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी गुरुसेवेसाठी स्वतःला समर्पित केले आहे. विविध सेवा करूनही श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ या कधीच थकलेल्या दिसत नाहीत. त्या सकाळी जशा उत्साही असतात, तशाच त्या रात्री उशिरापर्यंतही उत्साही असतात.
३. चंद्रघंटा – संतुलन आणि शौर्य
३ अ. प्रेमळ; पण साधकांच्या साधनेसाठी कठोर होणार्या आणि त्यांना चुकांची जाणीव करून देणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ ! : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ चंद्रघंटादेवीप्रमाणे एकीकडे सौम्य, तर दुसरीकडे दायित्व घेण्यासाठी सज्ज असतात. त्या सर्वच साधकांना प्रेमळ आईसारख्या वाटतात; पण ‘आवश्यक तेव्हा साधकांच्या साधनेसाठी कठोर होणे आणि साधकांना त्यांच्या गंभीर चुकांची जाणीव करून देणे’, ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. ज्याप्रमाणे एखादी आई मुलाच्या भल्यासाठी रागावते, त्याच प्रकारे ‘साधकांनी घडावे आणि त्यांनी प्रगती करावी’, हा त्यांचा त्यामागे उद्देश असतो.
४. कूष्माण्डा – निर्माणकर्ती आणि नवी ऊर्जा देणारी
४ अ. ‘शब्द, हास्य किंवा स्पर्श’ यांतून साधकांना सेवेसाठी ऊर्जा देणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ ! : कूष्माण्डादेवीने तिच्या स्मितहास्याने ब्रह्मांडाची निर्मिती केली. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा प्रत्येक शब्द, हास्य किंवा त्यांचा हलका स्पर्शसुद्धा साधकांना ऊर्जा देतो. बर्याच वेळा सनातन संस्थेच्या मोठ्या सोहळ्यांचे नियोजन असते. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ चित्रीकरण करणारे साधक, तसेच कला आणि नृत्य-गायन या सेवांशी संबंधित साधक यांचा सत्संग घेतात. तेव्हा त्या प्रत्येकाला त्याचे मत मांडण्यास सांगतात. प्रत्येकाला काही वेगळी कल्पना सुचली असल्यास किंवा वेगळी संकल्पना सुचवायची असल्यास त्या प्रत्येकाला आवर्जून विचारतात. त्या म्हणतात, ‘‘देव कुणाच्या माध्यमातून काय सुचवेल’, हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाचे मत हे तेवढेच मोलाचे असते.’’
सेवा झाल्यानंतर त्या आठवणीने साधकांचे कौतुक करतात. त्यांनी केलेले कौतुक म्हणजे केवळ शब्द नसतात, तर त्यात साधकांवरील विश्वास असतो. त्यांच्या बोलण्यातून साधकांना पुढील सेवांसाठी ऊर्जा आणि आशीर्वाद मिळतात.
५. स्कंदमाता – वात्सल्य आणि सगळ्यांना आपले समजणारी
५ अ. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व साधकांना प्रेमाने जपणे : स्कंदमातेने स्वतःच्या पुत्राला देवसेनेचा सेनापती बनवले. त्याचप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ प्रत्येक साधकाला स्वतःच्या मुलासारख्या जपतात आणि त्याला प्रेमाने घडवतात. त्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांशी एकसारख्या प्रेमाने बोलतात.
५ आ. चुकीसाठी प्रायश्चित्त घेतांना साधकाला ताण आल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी योग्य मार्गदर्शन करून त्याला आश्वस्त करणे : एकदा सेवेत माझ्याकडून एक गंभीर चूक झाली होती आणि त्यावर मी जे प्रायश्चित्त घेतले होते, ते माझ्याकडून पूर्ण होत नव्हते. त्याचा मला ताण आला होता. हे सूत्र मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना सांगितल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘केदार, ‘तुला चुकीची जाणीव झाली’, हे महत्त्वाचे आहे. तू ताण घेऊन हे प्रायश्चित्त पूर्ण करणे देवाला मुळीच आवडणार नाही. त्यापेक्षा या चुकीची जाणीव ठेवून तू यापुढे काळजीपूर्वक सेवा केलीस, तर ते देवाला आवडेल. त्यामुळे तू ताण घेऊ नकोस. तुला जेव्हा जमेल आणि जेवढे जमेल, तेवढेच प्रायश्चित्त घे.’’ श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला अशा प्रकारे आश्वस्त केल्याने माझा ताण दूर झाला आणि त्यानंतर मी यथाशक्ती ते प्रायश्चित्त पूर्ण केले.
६. कात्यायनी – आंतरिक शक्ती आणि न्यायबुद्धी
६ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी प्रसंगी कठोर निर्णय घेणे आणि कालांतराने ते योग्य ठरणे : कात्यायनीदेवी अधर्माचा नाश करणारी आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ या प्रसंगी कठोर निर्णय घेतात. त्यांचे निर्णय स्पष्ट आणि योग्य असतात. त्यांच्या निर्णयात अचूकताही असते. काही वेळा त्यांचे कठीण वाटणारे निर्णय नंतर ‘किती योग्य ठरले आहेत’, हे मी स्वतः अनुभवले आहे.
६ आ. एक निर्णय घेतांना साधकांमध्ये मतभिन्नता दिसल्यावर दोन्ही मतांचा अभ्यास करून साधकांना अधिक योग्य निर्णय घेण्यासाठी साहाय्य करणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ ! : एकदा चित्रीकरण सेवेसाठी एक उपकरण खरेदी करायचे होते. तेव्हा त्याचा अभ्यास करतांना त्या सेवेत असणार्या साधकांची मते भिन्न होती. त्यामुळे खरेदी प्रक्रियेसाठी विलंब होत होता; म्हणून मी हे सूत्र श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना सांगितले. त्यांनी दोन्ही मते जाणून घेतली आणि मला पुढील दृष्टीकोन दिला, ‘‘दोन्ही मते योग्यच आहेत. ‘ते उपकरण असावे’, असे वाटणारे साधक प्रत्यक्ष ती सेवा करत असल्याने त्यांना ते उपकरण आवश्यक वाटत आहे, तर ‘सध्या ते उपकरण नको’, असे म्हणणारे साधक त्यांच्या तांत्रिक सेवेतील अनुभवावरून असे म्हणत आहेत. तुम्हाला प्रत्यक्ष सेवा करतांना येणार्या अडचणी ठाऊक आहेत. त्यांना अनुभव असला, तरी ते सध्या प्रत्यक्ष सेवा करत नसल्याने त्यांना या अडचणी ठाऊक नाहीत. असा दोन्ही बाजूंनी विचार करून निर्णय घ्यायला हवा.’’ त्यानुसार विचार करून आम्ही ते उपकरण घेण्याच्या निर्णयाप्रत आलो आणि कृतज्ञता म्हणून त्यांना त्याविषयी कळवले. तेव्हा त्यांनी सांगतले, ‘‘केवळ अनुभव चालत नाही प्रत्यक्ष सेवा करतांना येणार्या अडचणींचाही विचार होणे अपेक्षित असते.’’
७. कालरात्री – अंधाराशी सामना करणारी
७ अ. साधकांच्या जीवनातील अडचणींवर त्यांना आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करून त्यांच्यातील निरुत्साह घालवणे : साधकांच्या जीवनात अनेकदा कठीण प्रसंग किंवा अडथळे येतात. त्यांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कारणांमुळे साधनेत निरुत्साह जाणवतो, तर कधी घरातील अडचणींमुळे त्यांचे मन खचून जाते. अशा वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी बोलल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते. जशी कालारात्रीदेवी अंधाराशी सामना करते, त्याप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ एखाद्या दृष्टीक्षेपाद्वारे साधकांमधील निरुत्साह आणि भीती नाहीशी करतात. त्यांनी मला आतापर्यंत अनेक प्रसंगांत आईच्या मायेने आश्वस्त केले आहे. प्रत्येक वेळी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करून मला साधनेमध्ये अन् गुरुदेवांच्या चरणांशी ठेवले आहे.
८. महागौरी – शुद्धता आणि करुणा
८ अ. साधकांना आत्मिक शांती देणारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची वाणी आणि कृती ! : जशी महागौरीदेवी शांत, निर्मळ आणि प्रसन्न आहे, तशीच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची वाणी अन् कृती साधकांना आत्मिक शांती देते. त्या जेव्हा भक्तीसत्संगामध्ये एखादी कथा सांगतात, तेव्हा ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते.
९. सिद्धिदात्री – पूर्णत्व आणि शक्ती प्रदान करणारी
९ अ. साधकांना योग्य दृष्टीकोन देऊन त्यांच्यातील शक्तीचा जागर करून त्यांना प्रेरणा देणे : सिद्धिदात्रीदेवीप्रमाणे त्या प्रत्येकाला त्याच्या साधनेच्या योग्य टप्प्यापर्यंत नेत आहेत. साधकांमधील आत्मविश्वास आणि गुरुदेवांप्रती श्रद्धा वाढवण्यासाठी योग्य दृष्टीकोन देऊन त्या साधकांना केवळ आधार देत नाहीत, तर साधकांच्या आत दडलेल्या शक्तींचा जागर करत आहेत. त्यामुळे अनेक साधकांनी स्वतःतील गुण ओळखून ते वाढवले आहेत. त्या केवळ मार्ग दाखवत नाहीत, तर साधकांना त्यांचे स्वतःचे सामर्थ्य दाखवतात. त्या साधकांना साधनेसाठी नेहमी प्रेरणा देतात. काहींना सेवा, काहींना संयम, तर काहींना नेतृत्व शिकवतात.
– श्री. केदार नाईक, ढवळी, फोंडा, गोवा. (३१.८.२०२५)
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !