
धर्मशास्त्रात तीन पिढ्यांपर्यंत पिंडदान करण्यास सांगितले आहे. त्यांच्या आधीच्या पितरांची गणना दिव्य पितरांमध्ये केलेली आहे, म्हणजेच त्यांना मुक्तरूप मानले आहे. तसेच आपल्या आधीच्या तीन पिढ्यांतील पूर्वजांच्याच आपल्याकडून जास्त अपेक्षा असतात आणि त्या आधीच्या पिढ्यांतील पूर्वजांच्या तेवढ्या अपेक्षा नसतात. श्राद्धात मुख्य पिंड आधीच्या तीन पिढ्यांसाठीच असले, तरी त्या आधीच्या पिढ्यांतील कुणास गती मिळाली नसल्यास त्यांच्यासाठी श्राद्धात धर्मपिंड दिले जातात. अशा प्रकारे श्राद्ध हा हिंदु धर्मात सांगितलेला एक परिपूर्ण विधी आहे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्ध भाग २’)
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
क्रिकेटचा उदो उदो नको !