‘१२.९.२०२५ या दिवशी मी हरवळे (गोवा) येथे महालय श्राद्धविधी केला. या विधीच्या वेळी गुरुकृपेमुळे मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
![]()
१. श्राद्धविधीचा पितरांवरील परिणाम
अ. श्राद्धविधीला प्रारंभ होताच तेथे सूक्ष्मातून आमच्या २० ते २५ पितरांचा एक गट उपस्थित होता. माझी बहीण सुश्री दीपाली होनप हिलाही ‘पूर्वजांची गर्दी जमली आहे’, असे जाणवले.
आ. त्यांपैकी १ पितर रडत होता. त्याचे कारण मला समजू शकले नाही.

इ. विधी पूर्ण झाल्यावर ‘रॉकेट भूमीवरून आकाशात वेगाने झेपावते, त्याहून अधिक गतीने तेथे उपस्थित असलेल्या पितरांपैकी ५ पितर वेगाने विविध दिशांना गेले’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले.
श्राद्धविधीमुळे पितरांना अन्न, पाणी आणि मंत्र यांद्वारे पुष्कळ दैवी ऊर्जा प्राप्त होते. परिणामी त्यांचा पुढील प्रवास चालू होतो. यालाच ‘श्राद्धविधीद्वारे पितरांना गती मिळते’, असे म्हटले आहे.
ई. ज्या पितरांना गती मिळू शकली नाही, त्या पितरांना त्यांच्या ग्रहणक्षमतेनुसार श्राद्धविधीतील दैवी ऊर्जा ग्रहण करता आली.
उ. विधी संपल्यानंतर विधीच्या वेळी आलेले पितर त्या ठिकाणाहून निघून गेले.
२. श्राद्धविधीचा स्वतःवर झालेला परिणाम
विधी संपल्यानंतर मला डोक्यावरील ओझे न्यून झाल्याप्रमाणे हलकेपणा जाणवू लागला. सुश्री दीपाली हिलाही असेच जाणवले.
‘श्राद्धविधी करण्याचे महत्त्व मला वरील सूक्ष्म परीक्षणाद्वारे शिकायला मिळाले’, याबद्दल माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०२५)
|
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !