मूळ पारंपरिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘सनातन संस्था’ आणि ‘गोमन्तक’ यांचे आयोजन !

चित्रविचित्र आकारातील, विविध प्रकारच्या साहित्यांपासून बनवलेली श्री गणेशमूर्ती, भडक सजावट, कर्कश संगीत अशा प्रकारचे आजच्या काळातील गणेशोत्सवाच्या पालटलेल्या स्वरूपाला योग्य दिशा आवश्यक असल्याने शाडूच्या मातीची मूर्ती आणि पारंपरिक पर्यावरणपूरक सजावट यांना प्रोत्साहन देऊन गणेशोत्सवाची मूळ परंपरा, संस्कृती जोपासणे अन् त्याद्वारे सात्त्विकता अन् श्री गणेशाची कृपा भाविकांना अनुभवता यावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सांतइनेज (पणजी) – ‘सनातन संस्था’ आणि ‘गोमन्तक’ यांनी संस्कृती अन् आधुनिक तंत्रज्ञान यांची उत्तम सांगड घातली आहे. गणेशोत्सवाची मूळ परंपरा आणि तंत्रज्ञान यांना जोडणारे हे पाऊल आहे. आताच्या पिढीला संस्कृतीला जोडण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञान हे संस्कृतीचे मोठे प्रसारमाध्यम आहे. आजच्या काळात गणेशोत्सवाचे मूळ स्वरूप पहायला मिळत नाही. गणेशोत्सवाची मूळ सात्त्विक परंपरा आणि सोज्वळ स्वरूप या स्पर्धेद्वारे जपली आहे, असे विचार ‘कृतार्थ म्हार्दोळ’ या संस्थेचे संस्थापक श्री. राजेंद्र देसाई यांनी व्यक्त केले.

श्री गणेशोत्सवाची परंपरा आणि संस्कृती जोपासण्यासाठी ‘सनातन संस्था’ अन् ‘गोमन्तक’ प्रा. लि. यांनी संयुक्तपणे ‘सनातन गणेशोत्सव ‘फिल्म चॅलेंज कॉन्टेस्ट’चे आयोजन केले होते. या स्पर्धेचा निकाल १७ सप्टेंबर या दिवशी घोषित करण्यात आला. या कार्यक्रमात श्री. देसाई बोलत होते. पेडणे येथील श्री. गंगाराम ठाकूर यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. समारंभाला उपस्थित असलेले द्वितीय क्रमांक प्राप्त केलेले ताळगाव येथील धीरज तारी यांना श्री. राजेंद्र देसाई यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. धीरज तारी यांनी शिंपल्यांपासून सजावट केली होती.
स्पर्धेचे विजेते खालीलप्रमाणे आहेत –♦ प्रथम : गंगाराम ठाकूर ♦ द्वितीय : धीरज तारी ♦ तृतीय : धनिशा सावंत ♦ उत्तेजनार्थ : अरुण गावडे, अश्विनी सावंत |
हा समारंभ सांतइनेज येथील फोमेंतो सभागृहात पार पडला. समारंभाला ‘कृतार्थ म्हार्दोळ’ या संस्थेचे संस्थापक राजेंद्र देसाई, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, सनातन संस्थेच्या गोवा कार्यवाहक सौ. शुभा सावंत आणि गोमंतकचे ‘युनिट हेड’ विजू पिल्लई आदी मान्यवर उपस्थित होते. श्री गणेशाची शाडूची आणि सात्त्विक मूर्ती, आकर्षक अन् पर्यावरणपूरक सजावट, तसेच पूजनात सनातनची सात्त्विक उत्पादने वापरून कुटुंबियांसह बनवलेला व्हिडिओ प्रत्येक स्पर्धकाने पाठवला होता. पहिल्या क्रमांकाला १५ सहस्र रुपये, दुसर्या क्रमांकाला १० सहस्र रुपये, तिसर्या क्रमांकाला ५ सहस्र रुपये रोख, असे पारितोषिकांचे स्वरूप होते.
‘सनातन गणेशोत्सव फिल्म चॅलेंज कॉन्टेस्ट’चा पुरस्कार वितरण समारंभ सांतइनेज येथील फोर्मेतो सभागृहात पार पडला.
🌸 परंपरेला तंत्रज्ञानाची जोड! 🌸
‘सनातन संस्था’ आणि ‘गोमन्तक’ आयोजित या स्पर्धेत स्पर्धकांनी श्री गणेशाची शाडूची सात्त्विक मूर्ती 🙏, पर्यावरणपूरक व आकर्षक सजावट, तसेच… pic.twitter.com/dVMKiMShBJ
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) September 18, 2025
श्री. देसाई पुढे म्हणाले, ‘‘निसर्गाशी जोडला गेलेला हा उत्सव असल्याने श्री गणेशाची मूर्ती ही मातीचीच असावी, हे कटाक्षाने पाळले गेले पाहिजे. सजावटीसाठी वापरली जाणारी माटोळी हीसुद्धा निसर्गाशी माणसाला जोडते. गोव्यात भावंडे, कुटुंबीय एकत्र येऊन श्रद्धेने हा उत्सव साजरा करतात. जोडप्याला एकटे मूल असणार्या काळात हा सण भावंडांना एकत्र आणणारा सण आहे. गणेशोत्सवातील याच छोट्या छोट्या गोष्टींतून मोठे संस्कृतीदर्शन होते. संस्कृतीरक्षणाचे हे कार्य पुढे आणखी मोठे रूप घेईल.’’ ‘संस्कृती जपण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल म्हणजे दिवाळीत ‘किल्ले बनवा स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे’, असेही त्यांनी सांगितले.
आदर्श गणेशोत्सव पुढच्या पिढ्यांना कळणे आवश्यक ! – सौ. शुभा सावंत, कार्यवाहक, सनातन संस्था
श्री गणेशाच्या पूजनाची, परंपरागत पर्यावरणाला पूरक अशी माटोळी सजावट हे पुढच्या पिढ्यांना कळणे आवश्यक आहे. गणेशोत्सवात आता समाविष्ट झालेले चुकीचे प्रकार म्हणजे गणेशोत्सव असे समीकरण निर्माण होऊ नये आणि आदर्श गणेशोत्सव कसा असतो, हे लोकांना कळावे, यासाठी हा उपक्रम आहे. त्यामुळे मातीची मूर्ती, पारंपरिक माटोळ्यांची सजावट आणि शास्त्रशुद्ध पूजन, असे या स्पर्धेचे स्वरूप ठरवले.
गोव्यातील परंपरागत गणेशोत्सव आणि कुटुंबाचे एकत्रीकरण जगभरात पोचणे आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
‘सनातन गणेशोत्सव’ यातून गोव्यातील परंपरागत गणेशोत्सव जगभरातील सर्वांना पहायला मिळावा आणि गणेशोत्सवाची मूळ संस्कृती जपली जावी, हा या स्पर्धेचा मूळ हेतू होता. सनातन संस्था ही संस्कृती संवर्धनातील अग्रणी आहे. गोव्याचा विचार मांडणारे वृत्तपत्र ‘गोमन्तक’ने पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करता आली. अनेक राज्यांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो; परंतु गोव्यातील गणेशोत्सवाची परंपरा येथील एकत्र कुटुंबपद्धतीमुळे विशेष आहे.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !