
सांगली – मिरज तालुक्यातील अंकली येथे ६ सप्टेंबर या दिवशी शीतल धनपाल पाटील (वय २५ वर्षे) हा तरुण मिरवणुकीत झालेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेला असतांना त्याच्यावर धारदार शस्त्राने आक्रमण करण्यात आले. गंभीर अवस्थेत त्याला तात्काळ सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले; मात्र उपचार चालू असतांनाच ८ सप्टेंबरच्या रात्री त्याचा मृत्यू झाला. ९ सप्टेंबरच्या सकाळी शीतल पाटील यांचे पार्थिव अंकली गावात आणण्यात आले. या वेळी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला. ग्रामस्थांनी शीतल यांचे पार्थिव थेट आरोपींच्या घरासमोर ठेवत कडक कारवाईची मागणी केली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ संशयित विकास घळगे, क्षितिज उपाख्य आप्पा कांबळे आणि आदित्य घळगे या तिघांना अटक केली. त्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !