(‘इस्रो’ म्हणजे ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन’)

बेंगळुरू – ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्याला साहाय्य करण्यासाठी ‘इस्रो’च्या ४०० शास्त्रज्ञांनी दिवसरात्र काम केले, अशी माहिती ‘इस्रो’चे प्रमुख व्ही. नारायणन् यांनी दिली. ते ‘ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन’च्या (ए.आय.एम्.ए.च्या) ५२ व्या राष्ट्रीय व्यवस्थापन परिषदेत बोलत होते. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पहलगाम आतंकवादी आक्रमणाविरुद्ध पाकिस्तानला योग्य उत्तर दिले. या मोहिमेच्या अंतर्गत सैन्याने अचूक हवाई आक्रमणे करून पाकिस्तानमधील अनेक आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले.
नारायणन् म्हणाले की,
१. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी सर्व उपग्रह दिवसरात्र सुरळीतपणे काम करत होते.
२. ४०० हून अधिक शास्त्रज्ञांनी संरक्षणदलाला अचूक माहिती पुरवण्यासाठी दिवसरात्र काम केले. त्यामुळे सैन्याला अचूक लक्ष्य करण्यात साहाय्य झाले.
३. ‘इस्रो’च्या किमान १० उपग्रहांनी देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी २४ घंटे काम केले.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण