
(लेझर लाईट म्हणजे विद्युत चुंबकीय उत्सर्जनामुळे निर्माण झालेला प्रकाश)
सातारा, ९ सप्टेंबर (वार्ता.) – पोलीस प्रशासनाने गणेशोत्सवात लेझर लाईटला प्रतिबंध केला असतांना विसर्जन मिरवणुकीत ८ मंडळांनी आदेशाचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी ८ जणांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
करंज्याचा राजा गणेशोत्सव मंडळासमोर लेझर लाईट लावणार्या अजिंक्य लाईट्स यांच्यावर, विजय गणेशोत्सव मंडळासमोर लेझर लाईट लावणार्या सूरज आतार यांच्यावर, शिवनगर गणेशोत्सव मंडळासमोर लेझर लाईट लावणार्या साई लाईट्स यांच्यावर, बालदत्त गणेशोत्सव मंडळासमोर लेझर लाईट लावणार्या रितेश खरात आणि वदर देशमुख यांच्यावर, स्वा. सावरकर गणेशोत्सव मंडळासमोर लेझर लाईट लावणार्या अमित कदम यांच्यावर, श्री गणेशोत्सव क्रीडा मंडळासमारे लेझर लाईट लावणार्या राहुल बनसोडे यांच्यावर आणि श्री एकता गणेशोत्सव मंडळासमोर लेझर लाईट लावणार्या यश भोसले यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. सातारा पोलीस दलाने स्वत:हून ही कारवाई केली असली, तरी लेझर लाईट यंत्रणा शासनाधिन करण्याचे का टाळले ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
| कायद्याचा धाक राहिला नाही !
१२ घंट्यांहून अधिक काळ चालणार्या मिरवणुका, मिरवणुकीत डॉल्बी यंत्रणेचा (मोठा आवाज करणारी यंत्रणा) उपयोग, लेझर लाईटचा उपयोग कायदे करूनही थांबत नाही; कारण कठोर कारवाई होतांना दिसत नाही. कायद्याचे उल्लंघन करणार्यावर गुन्हे नोंद होतात; मात्र डॉल्बी यंत्रणा, लेझर लाईट यंत्रणा शासनाधिन करण्यात येत नाही. पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया सूज्ञ सातारावासीय व्यक्त करत आहेत. |
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !