Vice President Election 2025 : सी.पी. राधाकृष्णन् झाले भारताचे उपराष्ट्रपती !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सी.पी. राधाकृष्णन् भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती

नवी देहली : सी.पी. राधाकृष्णन् हे भारताचे नवे उपराष्ट्रपती झाले आहेत. लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी केलेल्या मतदानात राधाकृष्णन् यांना ४५२ मते पडली. ते सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार होते.

दुसरीकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मतांवर समाधान मानावे लागले. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या त्यागपत्रानंतर ही निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीत राधाकृष्णन् यांना अपेक्षेपेक्षा २५ मते अधिक मिळाली.