Jerusalem Attack : जेरुसलेम (इस्रायल) येथे झालेल्या आक्रमणात ६ जण ठार

इस्रायली नागरिकांवर आक्रमण

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलमधील जेरुसलेममध्ये ८ सप्टेंबरच्या सकाळी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ६ जणांचा मृत्यू झाला, तर १५ हून अधिक लोक घायाळ झाले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघे आक्रमणकर्ते मारले गेले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जेरुसलेमच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावरील ज्यू वस्तीकडे जाणार्‍या रस्त्याच्या मुख्य चौकात गोळीबार झाला. इस्रायलकडून गाझामध्ये चालू असलेल्या युद्धामुळे आता इस्रायली नागरिकांवरही आक्रमणे होत आहेत. हे आक्रमणही त्याचाच भाग होता.