
बेंगळुरू (कर्नाटक) – येथे अंजनप्पा गार्डन परिसरात ईदच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रध्वजात अशोक चक्राच्या ऐवजी उर्दू भाषेत मजकूर लिहिलेला ध्वज फडकवण्यात आला होता. चामराजनगर पोलीस ठाण्याचे अधिकार्यांना याची माहिती मिळताच त्यांनी ध्वज काढून टाकला.
पोलीस या प्रकरणात ‘ध्वज कुणी फडकवला ?’, ‘अशोक चक्राऐवजी उर्दू मजकूर लिहिण्याचे कारण काय ?’ याचे अन्वेषण करत आहेत.
हा तोच कार्यक्रम आहे, ज्यामध्ये विदेशातून इस्लामी धर्मगुरु सहभागी होणार होते. याविषयी कर्नाटक सरकारमधील मंत्री जमीर अहमद यांनी सांगितले होते की, विदेशातून आलेले धर्मगुरु केवळ संमेलनात सहभागी होतील. कोणतेही धार्मिक प्रवचन देणार नाहीत.
संपादकीय भूमिकाअशी कृत्ये अल्पसंख्यांकांची निष्ठा राष्ट्राशी नाही, तर धर्माशी आहे, हेच वारंवार लक्षात आणून देत आहेत. यामुळेच वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तानची निर्मिती झाली असली, तरी भारतात या वृत्तीचे लोक आजही आहेत, हे विसरू नका ! |
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court