निवडणूक आयोगावर अविश्वास दाखवत कर्नाटकातील काँग्रेसचा अजब निर्णय
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक स्थानिक निवडणुका मतदान यंत्रांद्वारे नाही, तर ‘बॅलेट पेपर’द्वारे (मतदान पत्रिकेद्वारे) लढवणार असल्याची घोषणा काँग्रेस सरकारने केली आहे. काँग्रेसचा दावा आहे की, मतदान यंत्रांमुळे निवडणुकीत हेराफेरी होत आहे. तथापि निवडणूक आयोगाने अनेक वेळा विरोधकांचे दावे फेटाळून लावले आहेत. आयोगाच्या मते, मतदान यंत्रे ‘हॅक’ करणे केवळ कठीणच नाही, तर अशक्य आहे. असे असले, तरी कर्नाटक मंत्रीमंडळाने राज्यातील आगामी पंचायत आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘बॅलेट पेपर’ने घेण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाला करण्याचा निर्णय जाहीर केला.
🚨 In Karnataka, Congress has decided to hold local body elections using ballot papers instead of EVMs!
In 2025, in the age of Artificial Intelligence, such a move is nothing short of ridiculous.
Is this distrust of the Election Commission an attack on democracy & part of an… pic.twitter.com/tIB58IyA3c
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 5, 2025
कर्नाटकाचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच्.के. पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, लोकांचा ‘मतदान यंत्रां’वरील विश्वास आणि विश्वासार्हता अल्प होत आहे. (मतदान यंत्रांवर नव्हे, तर समाजघातकी काँग्रेसवरील लोकांचा विश्वास अल्प झाला आहे ! – संपादक) ते म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाला ‘मतदार सूचीत सुधारणा करणे सोपे व्हावे’, यासाठी आम्ही आवश्यक कायदेशीर उपाययोजना करण्याचा आणि विद्यमान नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
संपादकीय भूमिका
|

सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
संपादकीय : ‘विद्यार्थीहिताय ।’