कॅसिनोंवरील कर २८ टक्क्यांवरून ४० टक्के

पणजी, ४ सप्टेंबर (वार्ता.) – केंद्रशासनाने कॅसिनो जुगार, रेस क्लब, क्रीडा सट्टेबाजी, लॉटरी आणि ऑनलाईन मनी गेमिंग आदींवरील कर २८ टक्क्यांवरून ४० टक्के केला आहे. यामुळे गोव्यातील कॅसिनो उद्योगाला मोठा धक्का बसला आहे.
गोव्यात मांडवीत ६ तरंगते आणि भूमीवरील मिळून एकूण २१ कॅसिनो आहेत. राज्यातील कॅसिनोंकडून सरकारला गेल्या ५ वर्षांत १ सहस्र ४०० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. जी.एस्.टी. दरात वाढ झाल्याने राज्यातील कॅसिनोंच्या व्यवसायावर कराचा अधिक भार पडणार आहे. गोव्यात नवीन कॅसिनोसाठी होणारी गुंतवणूकही वाढीव करदरामुळे थांबवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रशासनाच्या मते जुगार, सट्टेबाजी आणि ऑनलाईन गेमिंग हे उच्च धोका असलेले आर्थिक गैरव्यवहार आहेत अन् यामुळे त्यावर अधिक कर लावणे आवश्यक आहे. महसूल वाढवणे आणि सामाजिक परिणाम नियंत्रित करणे, हे यामागील कारण आहे.
जी.एस्.टी.चे नवीन दर अर्थव्यवस्थेसह समाजासाठीही लाभदायक ! – गोवा चेंबर ऑफ कॉमर्स
पणजी – जी.एस्.टी.तील पालट अर्थव्यवस्थेह समाजासाठीही लाभदायक आहेत. विमा आणि आरोग्य सेवांवरील जी.एस्.टी. कर हटवल्याने या सेवांच्या मागणीत वाढ होणार आहे. जी.एस्.टी.मधील सुधारणा आर्थिक वाढीसाठी पूरक आहे. यासाठी देशाची सामाजिक आणि आर्थिक घडी भक्कम होण्यास साहाय्य होणार आहे, अशी प्रतिक्रिया ‘गोवा चेंबर ऑफ कॉमर्स’च्या अध्यक्षा प्रतिमा धोंड यांनी व्यक्त केली आहे.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !