
लोकमान्य टिळक यांनी चालू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा मूळ उद्देश भारतियांचे संघटन हा होता. त्यामुळे भारतियांच्या स्वातंत्र्यलढ्याला संघटनाचे बळ लाभले आणि त्याची परिणती म्हणून भारत स्वतंत्र झाला. देशवासियांचे आराध्य असलेला आणि प्रथम पूजला जाणारा श्री गणपति हा भारतीय मनांना एकत्र आणणारा दुवा असल्याचे हेरून लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन दिले. सार्वजनिक गणेशोत्सवाची एकीची, संघटनाची ही परंपरा आजतागायत चालू आहे. हिंदु समाजाचे शक्तीस्थान आणि संघटन यांचे प्रतीक असलेला गणेशोत्सव हा अलीकडच्या १-२ दशकांपासून हिंदू-मुसलमान सौहार्दाचे प्रतीक म्हणून दाखवला जातो. तसे दाखवणार्या अनेक बातम्या, विशेष स्तंभलेख आणि आता ‘रिल्स’ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असतात. हिंदु धर्म हा सहिष्णु असल्याने आतापर्यंत हिंदूंना संख्या प्राबल्याच्या आधारे कुणावरही वर्चस्व ठेवण्याची अथवा दाखवण्याची शिकवण दिलेली नाही. त्यामुळेच कधीही कुठल्याही पंथियावर कोणत्याही प्रकारची बळजोरी केल्याची उदाहरणे इतिहासात पहायला मिळत नाहीत. तरीही आज गणेशोत्सव, होळी, दिवाळी या सणांच्या वेळी हिंदूंपर्यंत हिंदु-मुसलमान ऐक्याचा संदेश पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील अथर्व सुदामे याने ‘मूर्ती कुणीही बनवली, तरी ती भक्तीभावाने बनवलेली असावी’, असे सांगत मुसलमान मूर्तीकाराकडून मूर्ती विकत घेत असल्याचा हिंदू-मुसलमान ऐक्याचा संदेश देणारा व्हिडिओ प्रसारित केला. हिंदूंनी या कथित ऐक्याला विरोध केल्यामुळे त्याने व्हिडिओ ‘डिलीट’ करून क्षमा मागितली असली, तरी हिंदू-मुसलमान ऐक्याचे अनेक पाईक या व्हिडिओच्या समर्थनासाठी सरसावले. दुसरीकडे मध्यप्रदेशातील भोपाळ येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘श्री गणेशमूर्ती हिंदु मूर्तीकारांनीच बनवाव्यात आणि विकाव्यात’, असे आवाहन केले आहे. सर्वधर्मसमभाववाल्यांच्या मानगुटीवर हिंदू-मुसलमान ऐक्याचे पिशाच्च बसले आहे. त्यामुळे तसा उपदेश ते हिंदूंना देत असतात; मात्र आता हिंदू जागृत झाल्याने ते असे फुकाचे सल्ले झुगारत आहेत, हेच यातून दिसून येते.

मूर्तीपूजा निषिद्ध असणार्यांनी मूर्ती का बनवावी ?
अथर्व सुदामे याच्या व्हिडिओत ‘मूर्ती बनवतांना मनात भक्तीभाव होता ना ? मग झाले’, असे वाक्य आहे. या वाक्यातून ‘मुसलमान व्यक्तीच्या मनात श्री गणेशाची मूर्ती बनवतांना भक्तीभाव होता, तर गणेशभक्तांनी भक्तीभावाने बनवलेली अशी मूर्ती घ्यायला हरकत नाही’, असा संदेश दिला गेला. नुकतेच वडोदरा (गुजरात) येथे ३ मुसलमानांनी मिरवणुकीच्या वेळी श्री गणेशाच्या मूर्तीवर अंडे फेकल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. मुसलमानांनी श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण केल्याच्या मागील वर्षीच्या घटना, बंगालमध्ये नवरात्रीत श्री दुर्गादेवीच्या मूर्तींवर आक्रमण या घटना विचारात घेतल्या, तर ‘खरोखरच मुसलमान मूर्तीकाराच्या मनात हिंदूंच्या देवतांविषयी भक्तीभाव असेल का ?’, हा प्रश्न आहे. ज्यांच्या धर्मग्रंथातच मूर्तीपूजा निषिद्ध मानली गेली आहे आणि जे अल्लाला न मानणार्यांना ‘काफीर’ समजतात, ते काफिरांच्या देवतांच्या मूर्ती भक्तीभावाने बनवू शकतात का ? याचा विचार करावा. कोणत्याही मुसलमानासाठी त्याचा धर्म म्हणजे इस्लाम प्रथम असतो. त्यामुळे ‘श्री गणेशमूर्ती बनवणे’ हा त्यांचा धंदा म्हणजे पैसा कमवण्याचे साधन झाले. त्यात त्यांच्या मनाचा कोणताही सहभाग असण्याची शक्यता नाही. मग तरीही मुसलमानाने भक्तीभावाने श्री गणेशमूर्ती बनवली असल्याने हिंदूंनी मनात काहीही न आणता ती मूर्ती घ्यावी, असा संदेश दिला जातो, असे कसे ?
गेल्या अनेक दशकांपासून साम्यवाद्यांनी हिंदु धर्मातील वर्णांना ‘जाती’ संबोधत जातींमधील उच्च-नीचतेचे अनेक प्रसंग माध्यमांतून दाखवले. साम्यवाद्यांनी क्लृप्त्या काढून हिंदूंचा जाणीवपूर्वक बुद्धीभेद केल्याची अनेक उदाहरणे आहेत. हा बुद्धीभेद हिंदूंच्या मनावर इतका बिंबला आहे की, आपण आत्मघात करत आहोत, याची साधी जाणीवही हिंदूंना होत नाही. त्यामुळेच भारतीय संस्कृतीवर व्हिडिओ बनवणारे ‘रीलस्टार’ (सामाजिक माध्यमांवरून व्हिडिओ प्रसारित करून प्रसिद्धी मिळवलेल्या व्यक्ती) कथित हिंदू-मुसलमान ऐक्याला प्रसारित करतात आणि हिंदू त्याला भुलतात.
नेहमी हिंदूंनीच पुढाकार का घ्यावा ?
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘‘या खोडसाळपणाचे खरे कारण दुसरे-तिसरे कोणते नसून हिंदू-मुसलमान ऐक्यरूपी पिशाच्चदीपिकांच्या मागे लागण्याचा हिंदूंनाच लागलेला सोस, हेच होय.’’ सुदामे याच्या व्हिडिओला विरोध करतांना हिंदूंनी सुदामे याला ईदच्या दिवशी मुसलमानांना सामाजिक बंधुत्वाचे धडे देण्याचे आवाहन केले आहे. ‘या ऐक्यासाठी प्रत्येक वेळी हिंदूंनीच पुढाकार का घ्यावा ? एखाद्या मुसलमानाने ‘गाय ही आपल्या हिंदु बांधवांची माता आहे; म्हणून मुसलमानांची तिची हत्या करू नये’, असा व्हिडिओ प्रसारित करावा’, असेही आवाहन काही हिंदूंनी केले आहे. हिंदूंची ही मागणी योग्यच म्हणावी लागेल; कारण स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात तसे, मुसलमानांचे तळवे चाटून, त्यांच्या मागे लागून ऐक्य मिळवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ते गमावणेच आहे.
देवतेची मूर्ती ही हिंदूंच्या दृष्टीने आध्यात्मिक साक्षात्काराचे दैवी माध्यम आहे. मूर्ती ही केवळ व्यापाराचा विषय नाही. अत्यंत भक्तीभावाने श्री गणेशमूर्तीची स्थापना आणि विसर्जन प्रत्येक हिंदु करत असतो. ज्यांच्या अंतःकरणात त्या देवतेविषयी कणभरही आदर नाही, त्यांनी मूर्ती बनवणे, हे हिंदूंसाठी अत्यंत वेदनादायी आणि अवमानकारक आहे. मुसलमानांनी ‘गणपति बाप्पा मोरया’ म्हणणे, हिंदूंच्या देवतांसमोर हात जोडणे, हिंदूंच्या देवतांची नावे घेणे, ‘रील्स’मध्ये त्यांचा वापर करणे, यातून मुसलमानांचा हिंदूंच्या देवतांविषयीचा भक्तीभाव अथवा आदर व्यक्त होत नाही. ते सर्व केवळ सौहार्द दाखवण्याचे नाटक असते. त्यांच्या मनात खरोखरच आदर अथवा भक्तीभाव असेल, तर इतिहासात आणि वर्तमानातही मुसलमानांच्या पूर्वजांनी हिंदूंच्या देवता, मंदिरे यांच्यावर केलेल्या आक्रमणाविषयी क्षमा मागावी आणि इथून पुढे आक्रमणाची एकही घटना कुणा माथेफिरूकडूनही घडणार नाही, याची शाश्वती हिंदूंना द्यावी. अर्थातच असे होणे अशक्य आहे. त्यामुळेच हिंदूंनी हिंदू-मुसलमान ऐक्याच्या पिशाच्चदीपिकांना म्हणजे ढोंगी सौहार्दाला भुलू नये. हिंदूंनी सामाजिक माध्यमांवरील प्रत्येक व्हिडिओ डोळसपणे पहावा आणि आंधळेपणाने हिंदू-मुसलमान ऐक्याच्या कथित संदेशावर विश्वास ठेवू नये. हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान करून त्याला ‘सौहार्द’ अशी रंगीत झूल लावणार्यांचा खरा हेतू समजून घ्यावा. देवतांच्या मूर्तींविषयी श्रद्धा ठेवणार्यांनीच त्या मूर्ती घडवाव्यात आणि हिंदूंकडून मूर्ती खरेदी कराव्यात, यावर नेहमी ठाम रहावे.
| हिंदू-मुसलमान ऐक्याच्या ढोंगी सौहार्दाला हिंदूंनी भुलू नये, हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना ! |
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !