
‘१७.६.२०२५ या दिवशी दुपारी आम्हाला रामनाथी आश्रमातील साधक धैवत वाघमारे यांचे अकस्मात् निधन झाल्याचे समजले. याविषयी मी पू. वामन राजंदेकर (सनातनचे दुसरे बालसंत, वय ६ वर्षे) यांना सांगितले. त्या वेळी मी आणि पू. वामन यांच्यात झालेला संवाद पुढे दिला आहे. पू. वामन यांनी प्रगल्भतेने आणि कै. धैवत वाघमारे यांच्या साधनाप्रवासाविषयी सूक्ष्मातून त्यांना कळलेले सांगितले.

१. ‘कै. धैवत यांच्या समवेत नारायण असून, ते साधना करून पुढच्या लोकात प्रवास करून शेवटी नारायणांच्या चरणी एकरूप होणार आहेत’, असे सांगणे
सौ. मानसी : पू. वामन, आपल्या आश्रमातील साधक धैवत वाघमारे यांचे निधन झाले आहे, म्हणजे ते आता आश्रमात भेटतात, तसे आपल्याला भेटणार नाहीत. ते देवबाप्पाकडे गेले.
पू. वामन : हो. आई, ते मला समजले. ते आपल्या समवेत सूक्ष्मातील प्रयोगांना असायचे आणि आपल्याला आश्रमात भेटायचे. तेच धैवतमामा ना !

अ. आता ते नारायणांच्या अगदी जवळ गेले आहेत. नारायण त्यांच्या समवेत आहेत; कारण ते नारायणांचे आवडते साधक आहेत ना !
(पू. वामन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘नारायण’ असे संबोधतात.)
आ. काहीच काळजी करायला नको आणि काही वाईट झाले नाही. त्यांना नारायणांनी पुढे नेले आहे.
इ. ते आनंदात आहेत आणि त्यांची साधना त्यांच्या समवेत आहे. ते नारायण सांगतील, तशी साधना करत पुढच्या लोकांत प्रवास करून शेवटी नारायणांच्या चरणी एकरूप होतील.
ई. आताही नारायण त्यांना भेटायला प्रत्यक्ष येणार आहेत. त्यामुळे कसलीच काळजी नाही.
उ. त्यांचा आध्यात्मिक त्रास आता संपला आहे. ते आनंदाची अनुभूती घेत आहेत.
२. ‘सर्व माहिती नारायण देतात आणि सर्वांनी चांगले वागले पाहिजे’, असे सांगणे
त्यानंतर पू. वामन एकदम शांत झाले. मी त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला त्यांच्याबद्दल हे सर्व कसे ठाऊक झाले ?’’ त्यावर पू. वामन म्हणाले, ‘‘मला हे नारायणांनीच सांगितले आणि नारायणांचे सर्वांकडेच लक्ष असते. आपण चांगले वागलो, तर आपण नारायणांकडे जातो; पण जे चुकीचे आणि वाईट वागतात, त्यांना नारायण शिक्षा करतात. आपण खरे आणि चांगले वागले पाहिजे; कारण नारायणांना सर्व ठाऊक असते.’’ या संभाषणानंतर पू. वामन शांत झाले. ‘त्या दिवशी आणि नंतर पुढील २ दिवस ते अन्य दिवसांपेक्षा अधिक शांत होते’, असे मला जाणवले.’
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन यांच्या आई), फोंडा, गोवा. (२३.६.२०२५)
|
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !