पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये समाजातील काही मान्यवर वक्ते उपस्थित होते. त्यांनी सनातन संस्था आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् सनातनचे साधक यांच्याविषयी अनेक गौरवोद्गार काढले. काही मान्यवर वक्त्यांची भावजागृतीही झाली. त्याविषयी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

१. श्री. शेखर मुंदडा (अध्यक्ष, महाराष्ट्र गोसेवा आयोग), कोथरूड
अ. ‘माझे पहिले गुरु श्री श्री रविशंकर आहेत. दुसरे गुरु प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज आणि तिसरे गुरु म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! मी २८ वर्षे अध्यात्मात आहे; पण सनातन संस्थेमुळे मी खर्या अर्थाने हिंदुत्वाकडे अधिक प्रमाणात झुकलो आणि हिंदुत्वाचे कार्य करू लागलो.
आ. सनातनच्या साधकांचा एक सर्वांत मोठा वैशिष्ट्यपूर्ण गुण, म्हणजे मी त्यांना कधीच रागावलेले पाहिले नाही.
इ. मार्गदर्शन करतांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’विषयी ते म्हणाले, ‘‘आपण अनेकांनी चमत्कार पाहिले किंवा अनुभवले असतील. मीही अनुभवला. मे २०२५ मध्ये मी सनातनच्या ‘शंखनाद महोत्सवा’ला गेलो होतो. मे महिन्यात गोव्यात प्रचंड उकाडा असतो; पण तिथे गेल्यानंतर पहिल्या दिवशी पाऊस पडला आणि पुढचे तिन्ही दिवस अतिशय आल्हाददायक होते. साधकांची प्रचंड मोठी संख्या होती, तरीही सर्व कार्यक्रमाचे नियोजन सुंदर झाले होते. मी वातावरणात सुखदपणा अनुभवला.’’
२. पू. केशव गिंडे (सुप्रसिद्ध बासरीवादक), चिंचवड

२ अ. पू. केशव गिंडे गुरुपौर्णिमा महोत्सवाविषयी म्हणाले, ‘‘कार्यक्रम अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध झाला. प.पू. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) मला बोलावल्यावर ‘मी येणार नाही’, असे होऊच शकत नाही. यासाठी मी माझ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडे नंतर येण्यास सांगितले. आजची संध्याकाळ मी सनातनच्या गुरुपौर्णिमेसाठी राखून ठेवली होती.’
२ आ. साधकाने ‘संतांची पादत्राणे वेगळी ठेवतो’, असे सांगितल्यावर ‘हे केवळ सनातनच्या कार्यक्रमातच होऊ शकते’, असे पू. गिंडे यांनी सांगणे : जातांना त्यांना त्यांची चप्पल (पादत्राणे) हवी होती. त्यांनी त्यांच्या चपलांचे वर्णन सांगितल्यावर साधकाने त्या लगेच आणून दिल्या. तेव्हा त्यांनी विचारले, ‘‘इतक्या सगळ्या चपलांमध्ये माझी चप्पल लगेच कशी मिळाली ?’’ त्यावर साधकाने ‘‘आम्ही संतांची पादत्राणे वेगळी ठेवतो’’, असे सांगितल्यावर ‘‘हे केवळ सनातनच्या कार्यक्रमातच होऊ शकते’’, असे ते म्हणाले.
३. श्री. दादा वेदक (विश्व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख), चिंचवड
अ. ऐन वेळी सांगूनही दूरवर असलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून येण्याची सिद्धता दर्शवत ‘गुरूंसाठी मी कुठेही यायला सिद्ध आहे’, असे श्री. दादा वेदक यांनी सांगणे : श्री. दादा वेदक हे आधी त्यांना जवळ असलेल्या सिंहगड रस्ता येथील गुरुपौर्णिमेला जाणार होते; परंतु चिंचवड येथील वक्त्यांना येण्यासाठी अडचण आल्याने श्री. दादा वेदक यांना ‘‘वक्ता म्हणून येता का ?’’ असे दुपारी ४ वाजता विचारले. तेव्हा ते महोत्सवस्थळापासून पुष्कळ दूर होते. ते म्हणाले, ‘‘गुरूंसाठी मी कुठेही यायला सिद्ध आहे. तुम्ही जिकडे बोलवाल तिकडे येईन.’’ ते कार्यक्रमाचे निरीक्षण चांगल्या प्रकारे करत होते.
आ. त्यांनी आल्यावर चप्पल व्यवस्था पाहिली आणि म्हणाले, ‘‘पुष्कळ चांगली व्यवस्था केली आहे.’’
इ. कार्यक्रम चालू असतांना ते श्रोत्यांकडे पहात होते. शेवटी त्यांनी सांगितले, ‘‘श्रोत्यांपैकी कुणीही उठून गेले नाही. सर्व जण शांत चित्ताने ऐकत होते.’’ साधकांच्या चेहर्यावर असणारा आनंद पाहून ते म्हणाले, ‘‘तुम्ही अध्यात्म जगत आहात. साधना करत आहात; म्हणून तुम्ही सगळे आनंदी आहात. तुम्ही सेवेचा आनंद लुटत आहात.’’
ई. कार्यक्रम चालू असतांनाच ‘मला ग्रंथप्रदर्शन बघता येईल ना ? तुम्ही प्रदर्शन लगेच काढणार नाही ना ?’ असे त्यांनी विचारले. ‘त्यांना ग्रंथप्रदर्शन पहाण्यात अधिक उत्साह होता’, असे आम्हाला वाटले.
उ. ते मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करायचे असेल, तर साधना महत्त्वाची आहे. साधनेविना हे कार्य शक्य होणार नाही.’’
ऊ. कार्यक्रमाला उपस्थित श्री. विक्रम भावे यांचे अनुभवकथन ऐकल्यानंतर ते म्हणाले, ‘‘तुम्ही आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांना पुष्कळ त्रास भोगावा लागला.’’
ए. त्यांना स्वसंरक्षण प्रात्यक्षिक पुष्कळ आवडले. ते त्यातील प्रत्येक प्रसंगाचे कौतुक करत होते. त्यांनी प्रशिक्षक कु. प्राची शिंत्रे यांना कौतुकाची थाप दिली.
ऐ. त्यांनी काही साधकांना भेटल्यानंतर हक्काने सांगितले, ‘‘मी तुमच्या घरी जेवायला येईन’’, तसेच काही साधकांना त्यांनी त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रण दिले.
ओ. महाप्रसाद घेतल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘स्वयंपाक आपुलकीने बनवला असून पुष्कळ सुंदर झाला आहे.’’ तसेच पुढे ते म्हणाले, ‘‘तुम्ही सूक्ष्म चिंतन करून सेवा करता.’’

औ. ते म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्र पहाण्यासाठी सच्चिदानंद गुरुदेवांना ११० वर्षांपर्यंत रहावे लागेल’, अशी माझी प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचवा.’’
अं. ते म्हणाले,‘‘या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेवर वरदलक्ष्मी, धान्यलक्ष्मी आणि धनलक्ष्मी यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे या कार्याला कशाचीच न्यूनता भासणार नाही.’’
क. श्री. दादा वेदक म्हणाले, ‘‘पू. गिंडेकाका हे बासरीवादक आणि संत आहेत. यांच्या चेहर्यावर पुष्कळ तेज आहे. सनातनच्या प्रत्येक साधकाच्या चेहर्यावरही तेज आहे. ‘ते साधना करतात’, हे जाणवते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांच्या शिकवणुकीमुळेच इतका शिस्तबद्ध आणि आखीव-रेखीव कार्यक्रम होऊ शकतो. ‘प्रत्येक संतांच्या पायाखाली पाट आणि तांब्या भांडे, खडीसाखर आणि लवंग ठेवणे’, हे लहानसहान बारकावे केवळ सनातनचे साधकच करू शकतात. सर्व साधक स्वतः सेवा करत असतांना अत्यंत आनंदी असतात. त्यांच्या चेहर्यावर हास्य असते. ते शांत आणि स्थिर राहून सेवाभावाने सर्व करतात आणि ते हे सर्व सद्गुरूंचे आज्ञापालन म्हणून करतात.’’
ख. एकूणच ‘आधीचे वक्ते रहित होऊन श्री. दादा वेदक यांचे गुरुपौर्णिमेला येणे’, हे गुरुदेवांचे नियोजन होते’, असे साधकांना वाटले.
(क्रमशः)
संकलक : पू. (सौ.) मनीषा पाठक, पुणे (१३.७.२०२५)
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !