कर्नाटक उच्च न्यायालयाचे राज्यातील काँग्रेस सरकारला निर्देश
बेंगळुरू (कर्नाटक) – ‘प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेशमूर्तींवर बंदी घालण्याच्या अधिसूचनेची गांभीर्याने कार्यवाही करा’, असे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या वेळी न्यायालयाने कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रविष्ट (दाखल) केलेली याचिका निकाली काढली. पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याच्या आदेशाचे पालन केले जात नाही, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यावर उच्च न्यायालयाने सरकारला वरील निर्देश दिले.
⚖️ Karnataka HC to Congress govt: act on POP Ganesh idol ban.
Irony 👉 Bombay HC ruled POP idols aren’t harmful, yet Karnataka bans them.
🙏 Hindus expect the Hon’ble Supreme Court to take suo motu cognizance & lift the ban nationwide.#Ganeshotsav @gemsofcourts… https://t.co/Pl3JB5wVjp pic.twitter.com/zcDrpCt8IO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 17, 2025
सरकारी अधिवक्त्यांनी युक्तीवाद केला की, काही ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत आणि कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल. पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याचा सरकारी आदेश आधीच प्रसारित करण्यात आला आहे आणि त्याची कार्यवाही करणे आवश्यक असल्याने आम्ही (सरकार) कोणताही आदेश प्रसारित करणार नाही.
संपादकीय भूमिकामुंबई उच्च न्यायालयाने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्ती पर्यावरणासाठी, म्हणजेच पाण्यासाठी अहितकारी नाहींत, असा निर्वाळा दिला आहे. दुसरीकडे कर्नाटकात पीओपीच्या मूर्तींवर प्रतिबंध आहे. त्यामुळे आता माननीय सर्वोच्च न्यायालयानेच याची स्वत:हून दखल घेऊन (सुओ मोटो) देशभरात गणेशमूर्तींवरील बंदी उठवण्यासाठी निर्णय द्यावा, ही धर्मप्रेमी हिंदूंची विनंती नि अपेक्षा ! |

Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश