|

मुंबई – ‘डेअरी मिल्क’ या कॅडबरी चॉकलेटच्या नवीन वेष्टनावर इंग्रजी शब्दांचे, तसेच संवादांचे मराठी अर्थ छापण्यात आले आहेत. मराठीच्या या प्रयत्नाविषयी ‘बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळा’ने कॅडबरीला ‘मंडळ आभारी आहे’, असा प्रतिसाद दिला आहे. ‘तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम रहा, जग तुमची नोंद नक्की घेईल’, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वाक्याची कॅडबरीच्या नव्या वेष्टनामुळे चर्चा आहे.
वेष्टनावर लिहिलेले शब्द आणि वाक्ये
१. थँक यू – धन्यवाद
२. सॉरी – माफ करा
३. लिटिल – जरा
४. मॉर्निंग – सकाळ
५. व्हॉट – का ?
६. हाऊ आर् यू ? – कसे आहात ?
७. नीड हेल्प ? – मदत हवी का ?
८. इव्हिनिंग – संध्याकाळ

सामाजिक माध्यमांवर यासंदर्भात आलेल्या प्रतिक्रिया !
१. राज्य सरकारने मराठीच्या संवर्धनासाठी असे उपक्रम राबवले पाहिजेत.
२. महापालिकांनी विज्ञापनांतून असे उपक्रम राबवले पाहिजेत.
३. मराठी व्यावसायिकांनी त्यांच्या उत्पादनांवर असे प्रयत्न केले पाहिजेत.
संपादकीय भूमिकाअन्य पदार्थ किंवा उत्पादने यांनीही यातून बोध घेऊन मराठीचा प्रसार करावा ! |
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !